हिमायतनगर प्रतिनिधी नागेश शिंदे/-आज दिनांक सात ऑगस्ट रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथील नाभिक समाजाची कु. नीलिमा सुधाकर चव्हाण या मुलीवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आल्याच्या घटनेवरून हिमायतनगर येथील महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या वतीने आज घटनेचा जाहीर निषेध करून हिमायतनगर येथील तहसीलदारा मार्फत महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक लेखी निवेदन देऊन घटनेतील आरोपींना तात्काळ अटक करून त्यांना फाशीची शिक्षा द्या अन्यथा सर्व नाभिक समाज रस्त्यावर उतरून जनआक्रोश आंदोलन करेल अशी मागणी करण्यात आली यावेळी महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते….
![](https://www.satyaprabhanews.com/wp-content/uploads/2023/08/Picsart_23-08-07_13-25-22-067-605x1024.jpg)
याबाबत सविस्तर वृत्त असे की ओमळी,तालुका चिपळूण जिल्हा रत्नागिरी येथील नाभिक समाजाची एक तरुण कु. नीलिमा चव्हाण वय वर्ष 24 ही मुलगी दापोली येथील स्टेट बँकेमध्ये कंत्राटी कामगार म्हणून नोकरीला होती ति दिनांक 29 जुलै रोजी आपले काम उरकून आपल्या घरी परत जात असताना तिचे अपहरण करण्यात आले त्यानंतर तिच्यावर अत्याचार करून तिच्या डोक्यावरील केस काढून तिचा चेहरा विद्रूप करून तिचा खून करून तिचा मृतदेह दाभोळ खाडीमध्ये नेऊन फेकून देण्यात आला या घटनेमुळे नाभिक समाजासह पीडित मुलीच्या कुटुंबावर खूप मोठे दुःखाचे डोंगर कोसळले आहे याची तात्काळ चौकशी करून संबंधित घटनेतील आरोपींना पकडून त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी आज हिमायतनगर शहरातील महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या कार्यकर्त्यांनी हिमायतनगर येथील तहसीलदार यांच्यामार्फत महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दि 7 ऑगस्ट रोजी एक लेखी निवेदन देऊन या घटनेतील आरोपींना तात्काळ पकडून त्यांना फाशीची शिक्षा द्या अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रातील नाभिक समाज रस्त्यावर उतरून जन आक्रोश आंदोलन करेल lअशी मागणी केली आहे यावेळी महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे तालुका अध्यक्ष गजानन चायल ,नागेश शिंदे, गणेश वाघमारे, अवधूत गायकवाड, व्यंकटी गंधम, नरसय्या गंधम, रवी जोनापल्ले,ज्ञानेश्वर लिंगमपल्ले ,परमेश्वर सुरजवाड ,अमोल शिंदे ,मंगेश शिंदे , शेखर गंधम अभिजीत कळसे ,सोनू गायकवाड सह महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते