मुंबई : राज्याच्या विधिमंडळाच्या अधिवेशनाचं पावसाळी अधिवेशन सुरु आहे. आज सभागृहात संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांच्या उत्पन्न मर्यादा वाढीवर चर्चा रंगली होती. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसमधील एकेकाळचे सहकारी हसन मुश्रीफ आणि जयंत पाटली यांच्या जुगलबंदी रंगल्याचं पाहायला मिळालं. हसन मुश्रीफ यांनी उत्पन्न मर्यादा वाढीचा निर्णय टप्प्या टप्प्यानं होईल, असं म्हटलं त्यावर जयंत पाटील यांनी हसन मुश्रीफ यांची भूमिका टप्प्या टप्प्यानं बदलत गेली असा टोला लगावला.
सभागृहात काय घडलं?
हसन मुश्रीफ म्हणाले संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांच्या उत्पन्नाची मर्यादा २१ हजारांवरुन ५१ हजार रुपये करावी, अशी मागणी असल्याचं म्हटलं. ज्येष्ठ नागरिकांचं वय ६५ वरुन ६० करावं, अशी मागणी आहे ती टप्प्या टप्प्यानं शासन करेल, असं मुश्रीफ म्हणाले. हसन मुश्रीफ यांची खासगीत उत्पन्न मर्यादा ५० हजार रुपये करावी अशी भूमिका होती. त्यांची भूमिका टप्प्या टप्प्यानं बदत गेली आहे, असं जयंत पाटील म्हणाले. आज रुपयाचे अवमूल्यन मोठ्या प्रमाणात झाले आहे. २१ हजारांची किंमत आज जवळपास ५ ते ७ हजार रुपयांपर्यंत झाली आहे, याचा विचार करून ही मर्यादा वाढवण्यात यावी, अशी मागणी जयंत पाटील यांनी केली. # सत्यप्रभा न्यूज # नांदेड