अमरावती: जिल्ह्यातील अचलपूर तालुका अंतर्गत येणाऱ्या वडगाव तालुक्यातील आदिवासी एकलव्य मॉडेल रेसिडेन्सी शाळेतील आज पार्टीच्या सुमारास २६ विद्यार्थ्यांना नाष्ट्यातून विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या सर्व मुलांना अचलपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, वडगाव येथील आदिवासी एकलव्य मॉडेल रेसिडेन्सी शाळेत सुमारे ४०० विद्यार्थी शिकतात. यामध्ये स्थानिक राहिवाशांसह पंचक्रोशीतील मुला -मुलींचा समावेश आहे. आज सकाळी विद्यार्थ्यांनी अल्पोपहार घेतला त्यानंतर सुमारे २५ ते २६ विद्यार्थ्यांना मळमळ, उलट्या आणि अतिसाराचा त्रास होऊ लागला. त्यामुळे त्यांना तात्काळ अचलपूर येथील उपजिल्हा रुग्णालय दाखल करण्यात आले.
यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कांचन जवंजाळ, डॉ. स्नेहल बंग, डॉ. राठी डॉक्टर मडघे यांनी विद्यार्थ्यांवर उपचार केले. सदर घटनेची माहिती मिळताच अचलपूरचे तहसीलदार संजय गरकळ त्यांनी घटनेची पाहणी केली. यावेळी महाराष्ट्र टाईम सोबत बोलताना तहसीलदार संजय गरकळ म्हणाले की, आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना फूड पॉइजनिंग झाल्याची माहिती मिळाली या अनुषंगाने सर्व विद्यार्थ्यांच्या आरोग्याची चौकशी डॉक्टरांकडे केली. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती सदस्य स्थिर असून ते लवकरच बरे होतील अशी माहिती त्यांनी दिली.
# सत्यप्रभा न्यूज # नांदेड