हिमायतनगर प्रतिनिधी /- मागिल 8 दिवसा पासून हिमायतनगर तालुक्यात होत असलेल्या वादळी वाऱ्यासह अतिवृष्टीत खरिपाच्या पेरणीतील पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. पिके नेमकं बाळसं धरू पहात असलेल्या कोवळ्या पिकांवर अति पावसाने घाला घातला. परिणामी खरिपाची पेरणी धोक्यात आली असून शेतकरी मोठ्या अर्थिक संकटात सापडला आहे. या नैसर्गिक संकटातून बाहेर काढण्यासाठी शेतकऱ्यांना तात्काळ अर्थिक मदत करावी. अशी मागणी आज दि 25 जुलै रोजी स्वराज्य पक्षाचे तालुकाध्यक्ष अवधूत पाटील एकंबेकर यांनी एका लेखी निवेदना नुसार केली आहे.

यावेळी स्वराज्य पक्षाचे हदगाव, हिमायतनगर विधान सभेचे नेते माधवराव पाटील देवसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होती हिमायतनगर तालूका दंडाधिकार्यामार्फत शासनाला दिलेल्या निवेदनात अवधूत पाटील यांनी म्हटले आहे की, गेल्या वर्षी अतिवृष्टीत शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले होते. त्यामळे खरिपाची पेरणी करण्यासाठी शेतकऱ्यांना खाजगी कर्ज काढावे लागले, शासनाने शेतकर्याना वेळेवर पतपुरवठा करावा असे सर्व बॅकांना आदेशित केले. परंतू पहिल्याच कर्जाची परतफेड करता आली नसल्याने दुसरे कर्ज मिळणे शक्य नाही. परिणामी शेतकऱ्यांना मोठी अडचण निर्माण झाली. मोठ्या तडजोडी अंती खरिपाची पेरणी केली. परंतू पिके बाळसं धरू पहात असताना पावसाने अक्राळ, विक्राळ रूप धारण केले. परीणामी खरिपाची पेरणी धोक्यात आली आहे. शासनाने शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देवून दिलासा द्यावा. अशी मागणी स्वराज्य पक्षाचे तालुकाध्यक्ष अवधूत पाटील एकंबेकर यांनी केली आहे यावेळी तुकाराम वानखेडे, दिगांबर माने, हनुमंत वानखेडे विश्वनाथ देवसरकर, लक्ष्मण वानखेडे नवदिप वानखेडे, गजानन शिंदे, महेश शिंदे, अमोल पाळजकर, अवधूत वानखेडे, माधव कदम, बालाजी शिदे, रूतीक कदम, श्रीकांत सुर्यवंशी, रवि सुर्यवंशी, रवी सुर्यवंशी, अभिजीत सुर्यवंशी, बाळू सुर्यवंशी, गंगाराम जाधव, सुनिल जाधव, विलास जाधव, अमोल राणे, कुंडलिक जाधव आदिंच्याही स्वाक्षऱ्या आहेत.