हिमायतनगर प्रतिनिधी नागेश शिंदे| शहरातील भारतीय स्टेट बँकेमध्ये आज दिनांक 8 नोव्हेंबरच्या भर दुपारी बारा ते एक वाजेच्या सुमारास एका शिक्षकाच्या बॅगेतून 90 हजाराची रोख रक्कम चोरी करून आरोपी पसार झाल्याची घटना घडली याची माहिती हिमायतनगर पोलिसांना कळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन त्यांनी संबंधित बँकेतील सीसीटीव्हीची तपासणी केली असता त्यात दोन अज्ञात चोरट्यांनी साहेबराव रामराव देशमुख या शिक्षकाच्या बॅगेची चेन काढून त्या बागेतील 90 हजाराची रक्कम पळविल्याचे दिसून येत आहे त्या आरोपीचा हिमायतनगर पोलिसांकडून शोध घेण्याची मोहीम सुरू आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की हिमायतनगर शहरातील भारतीय स्टेट बँकेमध्ये चोरी होण्याची ही दुसरी ते तिसरी घटना असल्याचे समोर आले आहे मागील काही दिवसांपूर्वी शहरातील प्रतिष्ठित व्यापारी राजू आप्पा बंडेवार यांच्या मुनीमाच्या बॅगेतील लाखो रुपयांची रक्कम काही अज्ञात महिला चोरट्यांनी पळविली होती अशीच एक चोरी आज दिनांक 8 नोव्हेंबर च्या भर दुपारी शहरातील भारतीय स्टेट बँकेत घडली आहे दिवाळीचा बाजार असल्यामुळे शहराचे बाजारपेठ मोठ्या प्रमाणात गजबजून गेली आहे अनेक जन आपली दिवाळी आनंदात साजरी करण्यासाठी बँकेतून, व्यापाऱ्याकडून पैसे काढण्यासाठी शहरात येत आहेत ह्याच संधीचा फायदा घेत काही अज्ञात चोरट्यांनी आज दि 8 नोव्हेंबर रोजी शहरातील भारतीय स्टेट बँकेमध्ये साहेबराव रामराव देशमुख जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोनारी येथील मुख्याध्यापक ह्यांनी त्यांच्या खात्यातील शेतीमालाचे 40 हजार ए .टी.एम ने काढले व 50 हजार चां चेल देऊन त्याची एकूण 90 हजारांची रक्कम भारतीय स्टेट बँकेच्या शाखेतून उचल्याचे पाहून एका अज्ञात चोराणी त्या शिक्षकाचे पैसे पळविले असल्याचे फिर्यादी शिक्षक साहेबराव देशमुख यांनी सांगितले त्यानुसार पोलीस निरीक्षक बी.डी. भुसनुर यांनी तात्काळ घटनास्थळी पोलिस कर्मचारी पाठून तेथील. बँकेचे सी.सी.टीव्ही फुटेज तपासून पाहिले असता 2 अज्ञात व्यक्तीने चोरी केल्याचे दिसून येत आहे ह्या घटनेचा तपास हिमायतनगर पोलीस करीत असल्याचे पोलीस निरीक्षक यांनी सांगितले वृत्त प्रकाशित करेपर्यंत हिमायतनगर पोलीस स्थानकात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंद करण्याचे प्रक्रिया सुरू होती…
⬛दिवाळीनिमित्त बाजारपेठेत येताना सावधगिरी बाळगा :- पोलीस निरीक्षक बी. डी.भूसनुर दीपावलीची खरेदी करण्यासाठी शहरात अनेक जण आपल्या परिवारासह येथील बाजारपेठेत मौल्यवान दागिने व पैसे घेऊन येत आहेत याचा फायदा घेण्यासाठी काही अज्ञात चोरांची टोळी अनेक ठिकाणी सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे त्यामुळे शहरां सह तालुक्यातील सुजाण नागरिकांनी आप आपले मूल्यवान दागिने व पैसे सुरक्षित ठेवून बाजारपेठेत आपल्या दिवाळी सणाचा आनंद साजरा करण्यासाठी यावे व कुठेही अज्ञात व्यक्ती वर संशय निर्माण झाल्यास तात्काळ हिमायतनगर पोलिसांशी संपर्क करावा असे आव्हान हिमायतनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बी.डी.भुसनुर यांनी केले आहे