नांदेड दि.१८: यशोदा हॉस्पिटल सिकंदराबाद येथे नांदेड येथील सौ.कल्पना कुंटूरकर नावाच्या ५४ वर्षीय महिला रुग्णावर यशस्वीपणे बॅरिएट्रिक शस्त्रक्रिया करत रुग्ण महीलेस अतिलठ्ठपणामुळे होणाऱ्या त्रासातून मुक्तता केली आहे यशोदा हॉस्पिटल, सिकंदराबाद येथील सर्जिकल गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी विभागाचे प्रमुख व वरिष्ठ सल्लागार सर्जिकल गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. प्रसाद बाबू आणि डॉ. अमर चंद जे वरिष्ठ सर्जिकल गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट व बॅरियाट्रिक सर्जन यांच्या मार्गदर्शनात अतिलठ्ठपणावर यशस्वी बॅरिएट्रिक शस्त्रक्रिया करून रुग्णाचे वजन १२० किलावरून ७५ किलो ईतके कमी करत त्यांना होणाऱ्या दैनंदिन त्रासातून मुक्त केले आहे
याविषयी सविस्तर माहीती अशी की नांदेड येथील जनरल सर्जन राजेश कोमावाड यांनी प्राथमिक तपासणीनंतर त्यांना पुढील उपचारांसाठी यशोदा हॉस्पिटल, सिकंदराबाद येथील सर्जिकल गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. प्रसाद बाबू जे वरिष्ठ सल्लागार सर्जिकल गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट आहेत आणि डॉ. अमर चंद जे वरिष्ठ सर्जिकल गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट व बॅरियाट्रिक सर्जन आहेत यांच्याकडे पाठविले असता सदरील महीला रुग्णाचे वजन हे १२० किलो होते व त्यांना चालणे, धावणे आणि दैनंदिन कामात अनेक अडचणी येत होत्या त्या लक्षात घेत डॉ. प्रसाद बाबू आणि डॉ. अमर चंद यांच्या नेतृत्वाखाली बॅरियाट्रिक सर्जरी टीमने ११ जानेवारी २०२४ रोजी यशस्वीपणे बॅरिएट्रिक शस्त्रक्रिया केली.
बॅरिएट्रिक शस्त्रक्रियेनंतर आठ महिन्यांनी सौ.कल्पना आता पूर्णपणे सामान्य आहेत व त्या आता चालणे, धावणे आणि दैनंदिन काम करण्यास सक्षम आहे आणि बॅरिएट्रिक शस्त्रक्रियेमुळे त्यांचे वाढीव वजन तब्बल ४५ किलोंनी कमी होऊन ते आता १२० किलोवरून वजन ७५ किलो ईतके आले आहे.
जेव्हा आहार आणि व्यायाम यशस्वी होत नाहीत किंवा लठ्ठपणाशी संबंधित गंभीर आरोग्य समस्या असतात तेव्हा बॅरिएट्रिक शस्त्रक्रिया ( वजन कमी होण्यासाठी केली जाणारी शस्त्रक्रिया ) केली जाते. शस्त्रक्रियेमध्ये सहसा दोन भाग असतात: पहिल्या भागात स्लीव्ह गॅस्ट्रेक्टॉमीचा समावेश होतो आणि दुसऱ्या भागात, सर्जन वजन कमी करण्यात मदत करण्यासाठी आतडे पुन्हा कॉन्फिगर करतो. आणि रुग्णाचे वजन हळूहळू कमी होण्यास सुरुवात होते.
बॅरिएट्रिक सर्जरी म्हणजे काय?
बॅरिएट्रिक शस्त्रक्रिया ही एक प्रकारची शस्त्रक्रिया आहे जी व्यक्तींना बदल करून वजन कमी करण्यास मदत करते लठ्ठपणा लोकांच्या पाचक प्रणाली. हे सामान्यतः अशा लोकांसाठी मानले जाते जे गंभीरपणे लठ्ठ आहेत आणि आहार आणि व्यायामाद्वारे वजन कमी करू शकत नाहीत. बॅरिएट्रिक शस्त्रक्रियेच्या सामान्य प्रकारांमध्ये गॅस्ट्रिक बायपास, स्लीव्ह गॅस्ट्रेक्टॉमी आणि समायोज्य गॅस्ट्रिक बँडिंग यांचा समावेश होतो. या प्रक्रिया पोटात किती प्रमाणात अन्न ठेवता येईल यावर मर्यादा घालून, पोषक शोषण कमी करून किंवा दोन्ही कार्य करतात.
लठ्ठपणा ही एक गंभीर आरोग्य स्थिती आहे जी एकूणच आरोग्यावर परिणाम करू शकते, त्यामुळे त्याचे प्रभावी व्यवस्थापन आणि उपचार करण्यासाठी गॅस्ट्रो सर्जन सारख्या तज्ञांकडून उपचार घेणे महत्वाचे आहे
#सत्यप्रभा न्युज #नांदेड