हिमायतनगर प्रतिनिधी/- तालुक्यातील मौजे बोरगडी येथील शेतकरी महेश्वर आडेलू शेन्नेवाड वय 50 हे आपल्या गट नंबर 95 येथील सर्वे नंबर च्या शेतामध्ये मक्याला पाणी देण्यासाठी दुपारी साडेतीनच्या दरम्यान गेल्या असता तेथे त्यांना विषारी सापाने दंश केला. यात शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना आज दिनांक 19 जानेवारी दुपारी चारच्या सुमारास घडली या घटनेमुळे हिमायतनगर शहराच्या तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे मयत शेतकरी महेश्वर आडेलू शेन्नेवाड (वय 50,रा. बोरगडी) असे मृताचे नाव आहे त्यांच्या कुटुंबास तात्काळ शासनाने आर्थिक मदत करून सहकार्य करावे अशी मागणी गावकऱ्यांकडून केली जात आहे…
या बाबत सविस्तर वृत्त असे की नेहमीप्रमाणे आपल्या शेतीमध्ये काबाडकष्ट करून दुपारच्या वेळेला जेवण करून आपल्या शेतातील मक्याला पाणी देण्यासाठी मोजे बोरगडी येथे असलेल्या गट नंबर 95 मधील शेतीला पाणी देण्यासाठी गेले असताना महेश्वर आडेलू शेन्नेवाड वय 50 या शेतकऱ्यास विषारी सापाने यांच्या पायाला दंश केला. सर्पदंश झाल्याने अस्वस्थ वाटत असल्यामुळे व त्यांची प्रकृती गंभीर होऊ नये म्हणून घरच्या मंडळींनी त्यांना तात्काळ हिमायतनगर येथील ग्रामीण रुग्णालयात नेले शहरातील ग्रामीण रुग्णालयाच्या डॉक्टरांनी प्रथमोपचार करून सायंकाळी 4 वाजेच्या दरम्यान त्यांना मृत घोषित केले यांच्या पश्च्यात,वडील पत्नी, दोन मुले,एक मुलगी असा परिवार आहे या घटनेने बोरगडी गावावर शोककळा पसरली आहे व तालुक्यात या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे