छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी!विजय पाटील !
दि : २१/१२/२०२४
मामाच्या गावी होत असलेले 2 बालविवाह पोलिसांच्या सजगतेने थांबविण्यात यश आले. शिल्लेगाव हद्दीत एकाच आठवड्यातील सलग तिसरा बालविवाह दामिनी पथकातर्फे यशस्वीपणे थाबवण्यात आलेला आहे.
जिल्ह्यातील मुलींचे अल्पवयामध्ये होणाऱ्या लग्नांना प्रतिबंध घालण्यासाठी अशा चोरून होणाऱ्या बालविवाहाची गोपनीय माहिती काढून अशा विवाहांना थांबवून अल्पवयीन मुलींना विवाह बंधनात न अडकवता त्यांच्या इच्छेनुसार त्यांना उच्च शिक्षण घेऊन स्वावलंबी करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांच्या पालकांचे समुपदेशनाद्वारे मत व मन परिवर्तन करून पालकांना कायदेशीर बाबींची माहिती देऊन अशा बालविवाहातून मुलींची वेळीच सुटका करण्याची सक्त सूचना दामिनी पथक व प्रभारी अधिकारी यांना दिलेल्या आहेत.
दिनांक 18/02/2024 रोजी मा. महक स्वामी, उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग, वैजापूर यांना गोपनीय माहिती मिळाली की, म्हस्की, ता वैजापूर येथील एका अल्पवयीन मुलीचा तिच्या मामाच्या गावी सुलतानाबाद, ता गंगापूर येथे बालविवाह होणार आहे. अशी खात्रीशीर गोपनीय माहीती मिळाल्यावरून स्वामी मॅडम यांच्या सूचनेप्रमाणे दामिनी पथकाचे सपोनि आरती जाधव यांनी तात्काळ माहिती मिळालेल्या ठिकाणी जाऊन माहिती घेतली. तेथे विवाह सोहळा संपन्न होणार असल्याबाबतची पूर्ण तयारी दिसून आली. यावरून दामिनी पथकाने तात्काळ मुलीच्या आई-वडिलांची भेट घेउन विश्वासात घेऊन अधिक चर्चा केली असता त्यांनी मुलीचा विवाह लावून देत असल्याचे मान्य केले. सदर मुलीचे वय तपासले असता तिचे वय 15 वर्ष 02 महिने असल्याचे निष्पन्न करून ती अल्पवयीन असल्याबाबत आई-वडिलांच्या निदर्शनास आणून दिले.
सत्यप्रभा न्यूज