नांदेड दि.२७ : नांदेड जिल्हयातील गुन्हेगांरावर वारंवार प्रतिबंधात्मक कार्यवाही करुन सुध्दा त्यांचे वर्तणात सुधारणा होत नसल्याने अशा गुन्हेगांराना कारागृहात स्थानबध्द तसेच हद्दपार करण्यासंबंधाने मा. पोलीस अधीक्षक, नांदेड यांचे (Operation flush out) नुसार कार्यवाही चालु आहे.
त्याअनुषंगाने पोलीस ठाणे नांदेड ग्रामिण यांचेकडुन सराईत गुन्हेगार नामे शेख महेबुब उर्फ गो- यापिता शेख बाबु, वय २२ वर्ष, व्यवसाय बेकार, राहणार- ग्रामपंचायत जवळ, वाजेगांव, ता. जिल्हा नांदेड याचेवर चोरी करणे, गृहअतिक्रमण करुन विनयभंग करणे, खुनाचा प्रयत्न करणे, जबरी चोरी करतांना इच्छापूर्वक दुखापत करणे, दरोडा, घातक हत्यारांनी इच्छापूर्वक दुखापत करणे, अवैद्यरित्या हत्यार बाळगणे व त्याची विक्री करणे अशा प्रकारचे गंभीर स्वरुपाचे एकुण ०८ दखलपात्र गुन्हे दाखल असल्याने त्याचेविरुध्द एम. पी. डी. ए. अधिनियमाप्रमाणे प्रस्ताव मा. पोलीस अधीक्षक, नांदेड यांचेकडे प्राप्त झाला होता.
मा. श्री अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी सदर MPDA प्रस्तावमधील आरोपीस एक वर्षाकरीता स्थानबध्द करण्याबाबतची शिफारस मा. जिल्हादंडाधिकारी, नांदेड यांचेकडे केली होती. त्यावरुन मा. श्री अभिजित राऊत, जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, नांदेड यांनी सदर प्रस्तावातील गुन्हेगार हा “धोकादायक व्यक्ती” असल्याने आरोपी नामे शेख महेबुब उर्फ गो-यापिता शेख बाबु, वय २२ वर्ष, व्यवसाय बेकार, राहणार- ग्रामपंचायत जवळ, वाजेगांव, ता. जिल्हा नांदेड यास एक वर्षाकरीता हर्सल मध्यवर्ती कारागृह, छत्रपती संभाजीनगर येथे MPDA कायद्याअंतर्गत स्थानबध्द करण्याबाबतचे आदेश पारीत केले आहे. नमुद आरोपीस मध्यवर्ती कारागृह, छत्रपती संभाजीनगर येथे एक वर्षासाठी स्थानबध्द केले आहे. यापुर्वी नांदेड जिल्हयातील १८ गुन्हेगाराना MPDA कायद्याअंतर्गत एक वर्षासाठी कारागृहात स्थानबध्द केले होते, आता ती संख्या १९ झाली आहे.
महाराष्ट्र पोलीस अधिनियमाचे विविध कलमान्वये १७९ प्रस्तावावर हद्दपारीची कार्यवाही चालु आहे. सन २०२३ मध्ये २६ टोळ्यामधील ७९ इसमांना तसेच सन २०२४ मध्ये ०६ टोळ्यामधील २२ इसमांना असे एकुण १०१ इसमांना नांदेड जिल्हयाचे बाहेर हद्दपार करण्यात आले आहे.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड