विजय पाटील
छत्रपती संभाजीनगर दि २५ : १७ फूट उंचीच डबल डेकर पर्यटन छत्रपती संभाजीनगरात पुढील वर्षी मार्चमध्ये दाखल होण्याची शक्यता असून, या बसमध्ये बसून पर्यटकांना शहरातील ऐतिहासिक स्थळांना भेटी देता येणार आहेत.
बसचा मार्ग, तिकीट अंतिम करण्यासाठी लवकरच बैठक होणार आहे. महापालिकेकडून ही बस चालवली जाणार आहे. बसची किंमत एक कोटी ८४ लाख रुपये असून, सोलापूरची चव्हाण ऑटो व्हील्स कंपनी बसची बांधणी करत आहे. मुंबईच्या पर्यटन बसेसच्या धर्तीवर ही बस असेल. बसमध्ये स्वच्छतागृहासुद्धा असणार असून, वरचा मजला खुला राहणार आहे. बसची उंची १७ फूट राहणार असल्याने तिच्या मार्गावरील विजेचे तार हटवले जातील.
#सत्यप्रभा न्यूज # छत्रपती संभाजीनगर