हिमायतनगर प्रतिनिधी नागेश शिंदे /- मागील काळात तालुक्यातील पुरामुळे पुनर्वसित झालेल्या अनेक गावासाठी तात्काळ नागरी सुविधा देण्यात याव्या यासाठी हदगाव हिमायतनगर तालुक्याचे लोकनेते बाबुराव कदम कोहळीकर यांनी महाराष्ट्राचे मां. ना.अनीलजी पाटील मदत व पुनर्वसन मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या कडे हिमायतनगर तालुक्यातील आदेगाव,पवना, कामारी , दूधड सह टेभूर्णी या गावच्या विकासासाठी मागणी केली होत्या त्या पाठपुराव्यांस आज दि 24 जानेवारी रोजी अखेर यश मिळून मंजुरी प्राप्त झाली आहे त्यात हिमायतनगर तालुक्यातील पुनर्वसित गावांसाठी 14 कोटी 83 लाख असा निधी प्राप्त करून दिला आहे…
हदगाव विधानसभा मतदारसंघातील पुनर्वसित गावांना मागील अनेक वर्षा पासून कुठलाही लाभ मिळाला नव्हता ह्या तालुक्यात दोन नद्या वाहतात त्यात पैंनगंगा व दुसरी कायाधू नदी वरील अनेक गावे पुनर्वसित आहेत त्यामुळे लोकनेते बाबुराव कदम कोहळीकर यांनी दि 9 ऑगस्ट 2023 रोजी ना.अनीलजी पाटील मदत व पुनर्वसन मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या कडे मागणी केली होती की तालुक्यातील विविध नद्यांना आलेल्या महापुरामुळे हिमायतनगर तालुक्यात पुनर्वसित गावांमधील सिमेंट रस्ते नाली बांधकाम समाज मंदिर व मुख्य रस्ता हा नागरी सुविधाच्या कामांना शासन स्तरावरून प्रशासकीय मान्यता देण्यात यावी अशी मागणी केली होती त्या मागणीस आज दि 24 जानेवारी रोजी प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे हिंगोली लोकसभेचे खासदार हेमंत भाऊ पाटील यांनी ह्या विकास कामासाठी वेळोवेळी सहकार्य करून.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या कडून हिमायतनगर तालुक्यातील आदेगाव,पवना, कामारी , दूधड सह टेभूर्णी या गावासाठी अंदाजे 14 कोटी 83 लाख रुपयांचा निधी त्यांनी मंजूर करून दिला आहे त्यामुळे हिमायतनगर तालुक्यातील पुरामुळे पुनर्वसित झालेल्या गावातील सुविधेच्या कामांना आता लोकंनेते बाबुराव कदम कोहळीकर साहेबांच्या मार्फत चालना मिळणार असल्याने ह्या मतदारसंघातील नागरिकांनी त्यांचे शोषल मीडियाच्या माध्यमातून आभार व्यक्त केले.