विजय पाटील
अहमदपूर दि.,२२:
चाकूर मतदारसंघात निवडणुकीची तयारी पूर्ण झाली असून यावर्षी या मतदारसंघात दहा हजार ५८१ युवक पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
या पाठोपाठ मतदार संघात एक लाख ६५ हजार ४७९ महिला मतदान करणार आहोत.
अहमदपूर चाकूर मतदार संघाची एकूण तीन लाख ४८ हजार सोळा एवढी मतदारसंघ आहे यामध्ये एक लाख ८१ हजार ७०३ पुरुष तर एक लाख ६५ हजार ४७९ महिला मतदारांचा समावेश आहेत.
नव्याने नोंदणी झालेले दहा हजार पाचशे एक्याऐंशी तरुण यावर्षी मतदान करणार आहे तर यामध्ये ६१७२पुरुष व ४४१० स्त्री मतदार आहेत
अहमदपूर चाकूर विधानसभा क्षेत्रात यापूर्वी ३६७ मतदान केंद्रे असून यामध्ये आता नवीन नऊ मतदार केंद्राची भर पडली आहे आता एकूण ३७६ मतदान केंद्र झाले आहेत.
वयोवृद्ध व दिव्यांग मतदारांसाठी घरपोच मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे.
मतदारसंघात ८३३ सैनिक मतदार असून दिव्यांग मतदार ३७५० आहेत. त्यामध्ये २४२९ पुरुष, १३२१ स्त्री आहेत. अहमदपूर चाकूर विधानसभा क्षेत्रात एक तृतीय पंथी मतदाराची नोंदणी झालेली आहे.
दिव्यांग व ८५ वर्षावरील मतदारांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.त्यामध्ये व्हिल चेअर, रॅम्पची व्यवस्था करण्यात आली आहे.२० नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.
यावर्षी मतदानाच्या टक्केवारीत निश्चितपणे वाढ होईल असा विश्वास निवडणूक विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. विधानसभेसाठी २० नोव्हेंबर रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत मतदान होणार आहे.
निवडणूक आयोगाने ८५ वर्षांवरील मतदारांना घरबसल्या मतदान करण्याची संधी दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर विधानसभेसाठी अहमदपूर चाकूर विधानसभा मतदार संघातील २४८१ पुरुष आणि ३३९९ स्त्री मतदार असे एकूण ५५८० वयोवृद्ध घरबसल्या मतदान करणार आहोत .अहमदपूर विधानसभा मतदारसंघात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. 85 वर्ष वयावरील मतदाराची यादी तयार करण्यात आल्या असून घरपोच मतदानाची तयारीही करण्यात येणाऱ्या तिथली सांगितले अहमदपूर तालुक्यात चार ठिकाणी चेक पोस्ट लावण्यात आले असून त्यासाठी पोलीस प्रशासन ही सज्ज झाले आहे विभाग प्रमुखांच्या बैठकीत आचारसंहितेच्या पालन संबंधी सूचना करण्यात आले असून नगरपालिकेनेही शहरातील सर्व बॅनर काढून टाकले आहे त्यामुळे शहर बॅनर मुक्त झाले आहे अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सौ मंजुषा लटपटे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी उज्वला पांगरकर व नर्सिग जाधव,. यांनी दिली आहे यासोबतच या निवडणुकी यंत्रणेस नायब तहसीलदार संतोष अनर्थे, संजय भोसीकर, एम.ए. मुजावर, संतोष धाराशिवकर, अभिलाष जगताप, एस.आर. जवादे, एन.बी. अर्जूने, प्रल्हाद रिठे हे सहकार्य करणार आहेत.
९ नविन मतदान केंद्र
मागील निवडणूकीच्या वेळेस अहमदपूर -चाकूर विधनसभा निवडणूकीत३६७ मतदान केंद्र होते. त्यात ९ मतदान केंद्राची आता नव्याने भर पडली असून त्यात देवकरा, परचंडा, अहमदपूर, मांडणी, नांदुरा, शिरूर ताजबंद-२,हाडोळती -२ असे ९ नविन मतदान केंद्राची भर पडली आहे.
कोटअहमदपूर चाकूर मतदारसंघात आदर्श आचारसंहिता लागू झाली असून मतदारसंघातील सर्वांनी या आचारसंहितेचे पालन करावे. व प्रशासनात सहकार्य करावे.
. अहमदपूर चाकुर मतदारसंघात तीन लाख 48 हजार सोळा मतदार असून.
जास्तीत जास्त संख्येने सर्वांनी मतदान करून नवीन आदर्श निर्माण करावा.
सौ मंजुषा लटपटे
निवडणूक निर्णय अधिकारी, तथा उपविभागीय अधिकारी अहमदपूर
#सत्यप्रभा न्यूज # लातूर