हिमायतनगर प्रतिनिधी नागेश शिंदे/-शहरात वारकरी संप्रदायाचे महान संत संत शिरोमणी सेना महाराज यांची पुण्यतिथी आज दिनांक 11 सप्टेंबर रोजी शहरातील श्री परमेश्वर मंदिर मंगल कार्यालय येथे महाराष्ट्र नाभिक महामंडळा तर्फे मोठ्या आनंदात साजरी करण्यात आली त्यानंतर भव्य महाप्रसाद वाटप करण्यात आला…
याबाबत सविस्तर वृत्त असे की संत शिरोमणी सेना महाराज यांच्या पुण्यतिथीचे अवचित्य साधून शहरातील महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या तालुका शाखेच्या वतीने पुण्यतिथी मोठ्या आनंदात व विविध कार्यक्रमाने साजरी करण्यात आली यावेळी दिवंगत नाभिक समाजाचे ज्येष्ठ नेते स्व.परमेश्वर शिंदे यांचे नुकतेच दुःखद निधन झाले असल्याने कार्यक्रमाच्या प्रथमतःसर्व उपस्थित नाभिक समाज बांधवांनी त्यांना एक मिनिट श्रद्धांजली वाहून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली त्यानंतर संत शिरोमणी सेना महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले व उपस्थित नाभिक समाजाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना तलाठी दत्तात्रय पुणेकर यांनी असे सांगितले की शिक्षण हे नाभिक समाजाच्या उन्नतीचे माध्यम आहे त्यासाठी नाभिक समाजाच्या नव तरुण युवकांनी व्यसनाधीनतेच्या आहारी न जाता शिक्षणाकडे वळावे त्यामुळे समाजाची उन्नती व कुटुंबाची प्रगती होते असे त्यांनी अनमोल असे मार्गदर्शन यावेळी पुण्यतिथी कार्यक्रमानिमित्त उपस्थित नाभिक समाज बांधवांना केले या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभलेले दिलीप कोंडामंगल सर व सचिन कळसे सर यांनी सुद्धा उपस्थिताना मार्गदर्शन केले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मारोती गायकवाड,मारोती कोंडामंगल,गंगाधर जाधव सर , माजी नगराध्यक्ष कुणाल राठोड गजानन मांगुळकर ,लक्ष्मण डांगे, विपुल दंडेवाड, शहर महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे तालुकाध्यक्ष गजानन चायल उपाध्यक्ष पप्पू सोळंके सचिव नागेश शिंदे , दत्ता सोळंके,रवी जोनापल्ले, गणेश वाघमबरे,राजू सूरजवाड,गोपाळ घुंगरे, चंद्रकांत कळसे,गजानन सूरजवाड, अवधूत गायकवाड, ज्ञानेश्वर लिंगमपल्ले, ज्ञानेश्वर सोळंके,मंगेश शिंदे,शेखर गंधम सह नाभिक समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सचिन कळसे यांनी केले तर आभार गणेश वांघबरे यांनी मानले…