हिमायतनगर प्रतिनिधी/- नांदेड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने दरवर्षी जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात येते त्याच धर्तीवर दिनांक 15 जून रोजी बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी प्रकल्प क्रमांक तीन नांदेडच्या वतीने हिमायतनगर शहरातील विविध अंगणवाडी मध्ये विद्यार्थी प्रवेश उत्सव कार्यक्रम मोठ्या आनंदात साजरा करून उपस्थित विद्यार्थांना प्रताप गल्ली येथील अंगणवाडीच्या कार्यकर्त्या मंगलताई कोंडामंगल यांनी खाऊचे वाटप केले
याबाबत सविस्तर वृत्त असे की हिमायतनगर शहरातील नेहरूनगर येथील सुशीला निम्मेवाड, परमेश्वर गल्ली कन्या शाळेजवळील प्रतिभा तोटेवार, प्रताप गल्ली येथील मंगलताई कोंडामंगल, वडार गल्ली येथील प्रमिला येरेकर, जनता कॉलनी सरकारी दवाखान्याजवळील कांता पाटील आदी अंगणवाडी मध्ये तेथील महिला अंगणवाडी कार्यकर्त्यांनी त्यांच्या अंगणवाडी शाळेमध्ये दिनांक 15 जून रोजी सकाळी बाल विकास प्रकल्प अधिकारी नांदेड प्रकल्प क्रमांक तीन यांच्या आदेशानुसार अंगणवाडी मध्ये येणाऱ्या सर्व विद्यार्थी व पालकांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करत उपस्थित विद्यार्थ्यांना मान्सूनपूर्व उपाय योजनांचे मार्गदर्शन करत येथे उपस्थित असलेल्या गरोदर माता व प्रमुख पाहुण्यांचे पुष्पहार घालून स्वागत केले व वयोगट तीन ते सहा मधील लहान मुलांना त्यांनी पोषण आहार देऊन त्यांच्या वजन उंचीनुसार त्यांचे ग्रेड काढत त्यांच्या आहाराविषयी माहिती त्यांच्या पाल्यांना दिली यावेळी या परिसरातील असंख्य महिला व लहान थोर विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते