- स्थानिक नगरपंचायतीच्या अस्वच्छतेमुळे बालकाचा मृत्यू ?
- स्वराज चा मृत्यू झाला आणि वैधही चव्हाण वर नांदेड येथे उपचार सुरू..
- एकाचा अंत्यविधी करून चव्हाण परिवार दुसऱ्या बालकास जीव वाचविण्यासाठी नांदेडात दाखल..
हिमायतनगर प्रतिनिधी | नागेश शिंदे | शहरात मागील अनेक दिवसापासून परमेश्वर गल्ली,शिवनेरी चौक येथे घाणीचे साम्राज्य वाढले असून यावर स्थानिक नगरपंचायत कडून कोठलेही ठोस उपाययोजना होत नसल्याने हिमायतनगर शहरातील परमेश्वर गल्ली येथील स्वराज मारोती चव्हाण ह्या 2 वर्षाच्या चिमुकल्याचा डेंग्यू ( ई. बो.ला.) ह्या आजाराचा मुळे उपचारा दरम्यान दि 17 ऑक्टोंबर रोजी हैदराबाद येथे उपचारां दरम्यान मृत्यु झाला असून दि 18 ऑक्टोबर रोजी हिमायतनगर येथे त्या चिमुकल्या वर अंत्यसंस्कार करण्यात आले,त्याची 4 वर्षाची बहीण कू वैधही हिस ह्याच आजारामुळे नांदेड येथील रेंगे हॉस्पिटल मध्ये गेल्या दोन दिवसापासून उपचार चालू आहेत नगर पंचायत च्या अस्वछतेच्या कारणा मुळे संसर्गजन्य रोज पसरत असल्यामुळेच शहरात आजारी रुग्णांची संख्या वाढल्याचे ग्रामीण रुग्णालयासह खाजगी दवाखान्यात दिसून येत आहे.
या बाबत सविस्तर वृत्त असे की गेल्या अनेक दिवसापासून शहरांमध्ये ओला व सुका कचरा ठीक ठिकाणी दिसून येत असून याकडे नगरपंचायत चे प्रभारी मुख्य अधिकारी ताडेवाड यांनी शहरात कुठेही धूर फवारणी केली नाही व वेळेवर परमेश्वर गल्लीत स्वच्छ्ता केली नाही त्या संदर्भात सबंधित अधिकारी हे येथील कर्मचाऱ्याला सूचना देतात की नाही ? हिमायतनगर शहरातील बऱ्याच गल्लीतील नाल्यातील घान वेळेवर स्वच्छ करून शहरात ठीक ठिकाणी धूर फवारणी करण्याची अत्यंत आवश्यकता आहे असे शहरातील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक जाधव यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले येथील आरोग्य विभागाने नगरपंचायतीला लेखी स्वरूपात धूर फवारणी चे पत्र सुद्धा दिले असून या पत्रामध्ये त्यांनी नमूद केले की हिमायतनगर शहरात धूर फवारणी करणे अत्यंत गरजेचे आहे कारण दत्तनगर ,परमेश्वर गल्ली येथे डेंगू चे बरेच रुग्ण वाढले असून या डेंगू (ई.बो.ला.) संसर्गजन्य रोगांच्या हिमायतनगर शहरांमध्ये उद्रेक होऊ शकतो.
या दृष्टिकोनातून तात्काळ नगर पंचायत ने शहरात धूर फवारणीची आवश्यकता आहे. तरी या पत्राची दखल घ्यावी असे सांगितले पण न.प.चे मुख्याधिकारी हे हिमायतनगर शहरात धूर फवारणी करतील का? आज दि 18 ऑक्टोबर रोजी परमेश्वर गल्ली येथील एका 2 वर्षाच्या बालकाचा मृत्यू झाला व त्याच कुटुंबातील वैधही मारोती चव्हाण..अंदाजे वय 5 ह्या चिमुकली वर नांदेड येथील रेंगे हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू आहेत त्यामुळे नांदेड चे कर्तव्य दक्ष जिल्हाधिकारी अभिजीत राऊत साहेब यांनी ह्या बाबी कडे गांभीर्याने लक्ष देऊन येथील प्रशासनास वेळीच उपाय योजना करण्याच्या सूचना द्यावा अशी मागणी सुजाण नागरिकान मधून होत आहे.