हिमायतनगर प्रतिनिधी/- शहरातील ईदगाह मैदानाच्या बांधकामात लाखो रुपयांचा भ्रष्टाचार करणाऱ्या संबंधित गुत्तेदारा सह नगर पंचायतच्या अधिकारी कर्मचाऱ्यावर तात्काळ गुन्हे दाखल करण्याची मागणी हिमायतनगर येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा नगर पंचायतचे माजी उपनगराध्यक्ष मोहम्मद जावीद हाजी अब्दुल गणी यांच्या शिष्टमंडळाने दि 18 जुलै रोजी नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत साहेब हे हिमायतनगर येथे एका कार्यक्रमानिमित्त आले असताना त्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले व ईदगाह बांधकामात भ्रष्टाचार करणाऱ्या दोषीवर तात्काळ गुन्हे दाखल करा अन्यथा आम्ही लोकशाही मार्गाचा अवलंब करू असा इशारा त्या निवेदनात दिला…
या बाबत सविस्तर वृत्त असे की हिमायतनगर येथील ईदगाह मैदानाच्या बांधकामांमध्ये लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाला असल्याचे अनेक वेळा येथील नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी व तहसीलदार यांना तोंडी व लेखी सूचना देऊनही संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्याकडून ईदगाह मैदान वरील भ्रष्टाचार करणाऱ्या गुत्तदारास व कर्मचाऱ्यास येथील प्रशासन पाठीशी घालत असल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला होता त्यामुळे दिनांक 10 फेब्रुवारी रोजी माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांनी घटनास्थळी जाऊन सबंधित कामाची पाहणी केली होती तेव्हा त्यांनी येथील प्रशासन व जिल्हाधिकारी यांची त्यांनी भेट घेऊन या कामाची तात्काळ उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित गुत्तेदारावर गुन्हे दाखल करण्याच्या सूचना सुद्धा दिल्या होत्या तेव्हा सबंधित नगरपंचायत कार्यालयाकडून ईदगाह मैदानच्या कामाची चौकशी करण्यासाठी त्रिस्तरीय समिती नेमण्यात आली होती त्या समितीने अद्याप कुठल्याही प्रकारचा अहवाल किंव्हा ठोस कार्यवाही कार्यालयास सादर केला नाही त्यामुळे दिनांक 18 जुलै रोजी हिमायतनगर येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा नगर पंचायतचे माजी उपनगराध्यक्ष मोहम्मद जावीद हाजी अब्दुल गणी यांच्या शिष्टमंडळांनी हिमायतनगर येथे एका कार्यक्रमासाठी आलेले नांदेड जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी अभिजीत राऊत साहेब यांची भेट घेऊन त्यांना या प्रकरणी माहिती देत एक लेखी निवेदन देऊन संबंधित ईदगाह मैदानच्या कामाची तात्काळ उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित दोषीवर गुन्हे दाखल करा अशी मागणी केली अन्यथा येत्या काही दिवसात राष्ट्रवादी काँग्रेस सह सर्वपक्षीय कार्यकर्त्यांना सोबत घेऊन प्रशासनाच्या विरोधात लोकशाही मार्गाचा अवलंब करून तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा सुद्धा यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी त्या निवेदनात दिला आहे…
यावेळी नगर पंचायतचे माजी उपनगराध्यक्ष मोहम्मद जावीद हाजी अब्दुल गणी,सरदार खान पठाण, अनवर खान पठाण,शिवसेना अल्पसंख्यांक तालुका प्रमुख जफर लाला,काँग्रेस अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष फेरोज खुरेशी, राष्ट्रवादी शहर अध्यक्ष उदय देशपांडे,माजी शहर अध्यक्ष इरफान खान,सलीम खुरेशी,अजीम हिंदुस्थानी ,सोहेल खान पठाण,सय्यद आदिल, सह आदी जन उपस्थित होते