हिमायतनगर प्रतिनिधी नागेश शिंदे /- तालुक्यात वनपरिक्षेञ कार्यालयाच्यावतीने दि 5 जून रोजी वनपरिक्षेञ अधिकारी बालाजी चव्हाण यांनी नांदेडचे उपवनसंरक्षक केशव वाबळे, सहा.वन संरक्षक यांच्या उपस्थितीत जागतिक पर्यावरण दिनाची औचित्य साधून तालुक्यातील मौजे खडकी, टेभूर्णी,जवळगाव ,पारवा, वटफळी, चिचोंर्डी, महादापूर येथे जावून येथील नागरीकांना व शेतकऱ्यांना वनकर्मचार्यांनी जैवविविधता बाबत व प्लास्टिक वापराने होणार्या दुष्परिणा माहिती देत जनजागृती केली.
या बाबत सविस्तर वृत्त असे की ” मेरी लाईफ ” या अॅप बाबत उपस्थित नागरिकांना माहिती दिली असे वनपरिमंडळ अधिकारी अमोल कदम यांनी सांगीतले तालुक्यातील पोटा बु येथील मनीषा आश्रम शाळेत आज पर्यावरण दिनी वृक्षारोपनाचा कार्यक्रम घेण्यात आला व दुधड येथील हनुमान मंदीर परिसरात कडूलिंब, आवळा,चिंच जाभूळ,वड,ही वृक्ष लागवड करण्यात आली मंगरुळ येथील पैनगंगा नदीच्या काठावरील पडलेले प्लाॅस्टिक बाॅटल, उचलून तेथील तलाव परिसरावरील किनारा साफ केला. या सदर कार्यक्रमात वनपाल अमोल कदम, सुनिल मेटकर, विभूते मॅडम, वनरक्षक केंद्रे, अमृतवार, चव्हाण, खलसे, गीते,वाघमारे, गीते, खलसे, सोने यांनी सहभाग घेवून एका आगळ्या वेगवेगळ्या प्रकारे जागतिक पर्यावरण दिन साजरा करत हा कार्यक्रम यशस्वी रित्या संपन्न केला