– अखेर स्मशान भूमीतील 20 वर्षा पासूनचां पाण्याचा प्रश्न सुटला…
हिमायतनगर प्रतिनिधी नागेश शिंदे/- शहरातील लकडोबा चौक येथील हिंदू समशानभूमी मध्ये मागील वीस वर्षांपासून समशानभूमी परिसरात पाण्याची व सांडपाण्याची व्यवस्था नव्हती यामुळे अंत्यविधीसाठी आलेल्या नागरिकांना व पाहुणे मंडळींना पाण्याअभावी तसेच घरी परत जावे लागत होते त्यामुळे शहरातील सामाजिक कार्यकर्ते विलास वानखेडे, काँग्रेस शहराध्यक्ष संजय माने सह पत्रकार नागेश शिंदे यांनी हदगाव हिमायतनगर तालुक्याचे विद्यमान कार्यसम्राट आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्याकडे शहरातील हिंदू समशानभूमी येथे एका बोर ची मागणी केली होती ती मागणी आमदार साहेबांनी तात्काळ मान्य करून आज दिनांक 30 जून रोजी आमदार निधीतील बोर चे उद्घाटन काँग्रेस शहर अध्यक्ष संजय माने यांच्या उपस्थितीत करण्यात आले हिंदु समशान भूमी मध्ये मारण्यात बोरला भरभरून पाणी लागल्याने परिसरातील नागरिकांनी विद्यमान आमदार यांचे अभिनंदन केले…
याबाबत सविस्तर वृत्त असे की हिमायतनगर हे तालुक्याचे ठिकाण असल्यामुळे येथे दररोज एक दोन दुःखद घटना घडत असतात परमेश्वर मंदिर परिसरातील हिंदू समशानभूमी लकडोबा चौक येथील समशान भूमीची मागील अनेक दिवसांपासून खूप दैनिय अवस्था झाली होती त्यामुळे विद्यमान आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्याकडे येथील नागरिकांनी मागणी करून या समशानभूमीच्या कामासाठी नेहमी पुढाकार घेणारे आमदार माधवराव पाटील जवळगावकरानी नुकतेच या समशानभूमीमध्ये अंत्यविधी करण्यासाठी नगर पंचायत प्रशासनास बोलून दैनिका व समशानभूमी परिसरात हाय मॅक्स लाईटचे पोल सह वॉल कंपाऊंड भितीला लाखो रुपयांचा निधी मिळून देऊन येथील स्मशान भूमीचा त्यांनी कायापालट केला होता त्यानंतर काँग्रेस शहराध्यक्ष संजय माने व सामाजिक कार्यकर्ते विलास वानखेडे सह पत्रकार नागेश शिंदे यांनी विद्यमान आमदार यांच्याकडे या समशानभूमीमध्ये अंत्यविधी केल्यानंतर सांडपाण्याची व पिण्याच्या पाण्याची कुठलीही व्यवस्था नसल्याने अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरिकांना त्रास होत असल्याचे बोलून दाखवले होते त्यानंतर विद्यमान आमदार यांनी या मागणीची तात्काळ दखल घेऊन लवकरच मी येथे एक बोर मारून देतो असा शब्द दिला होता तो शब्द अखेर खरा करत त्यांनी आज दिनांक 30 जून रोजी सकाळी येथील काँग्रेस शहर अध्यक्ष संजय माने यांच्या उपस्थितीत शहरातील हिंदू समशान भूमी येथे एक बोर मारून देत येथील नागरिकांचा व गावकऱ्यांचा 20 वर्षा पासूनचा पाणी प्रश्न त्यांनी मार्गी लावला आहे ह्या बोर ला पण श्री परमेश्वर महाराज यांच्या कृपेने भर भरून पाणी लागल्याने वार्ड क्र 12,13 व 8 च्या नागरिकांची येन उन्हाळ्यात तहान भागणार असल्याच्या प्रतिक्रिया सुभाष मामा शिंदे यांनी यावेळी बोलून दाखविल्या आहेत त्यामुळे विद्यमान आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे यावेळी मंदिर संचालक शांतीलाल सेठ श्रीश्रीमाळ, मार्केट कमिटी संचालक सुभाष शिंदे, मंदिर कमिटी सचिव आनंदराव देवकते, काँग्रेस शहर अध्यक्ष संजय माने,विलास वानखेडे, विश्वंभर अनबोइंनवाड,बाबुराव पालवे, साहेबराव ढोणे,नथू शिंदे, उतम कोळेकर,परमेश्वर वानखेडे, बाबुराव माने, आडेलु काका,राजू पांढरे, होमगार्ड ओमप्रकाश गायकवाड, शिवाजी चव्हाण,परमेश्वर कटमवाड, पत्रकार नागेश शिंदे सह आदी जण उपस्थित होते