हिमायतनगर प्रतिनिधी /- शहरातील श्री परमेश्वर मंदिर देवस्थान येथे भव्य संगीतमय श्री विष्णुपुराण कथा, भव्य संगीतमय भागवत कथेचे पवित्र अधिक मासा निमित्त आयोजन
मागील दोन वर्षा पासून कोरोना काळामध्ये विविध धार्मिक कार्यक्रम घेता आले नव्हते, मात्र यंदा कोरोनाचा धोका टाळल्यामुळे श्री परमेश्वर मंदिर कमिटीने पवित्र अधिक श्रावण पुरुषोत्तम मास म्हणजे धोंड्याच्या महिना आला आहे. त्या निमीत्त श्री परमेश्वर मंदिर देवस्थान हिमायतनगर (वाढोणा) येथे महिनाभर संगीतमय धार्मिक कथा प्रवचन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. धोंड्याच्या महिन्याच्या सुरुवातीला म्हणजे दि. १८ जुलै २०२३ रोज मंगळवार ते २५ जुलै २०२३ रोज मंगळवार पर्यंत भव्य संगीतमय श्री विष्णुपुराण कथा श्री विष्णुपुराण प्रवक्ता ह.भ.प.आचार्य बालयोगी स्वामी गजेंद्र चैतन्यजी महाराज यांच्या मधुर वाणीतून दररोज वेळ दुपारी २.०० ते ५.०० वाजे पर्यंत होणार आहे. कथेची सांगता समाप्ती (काला) २५ जुलै २०२३ ला होणार आहे त्यानंतर दि. २६ जुलै २०२३ रोज बुधवार ते ०२ ऑगस्ट २०२३ रोज बुधवार पर्यंत भागवत कथा श्री परमेश्वर मंदिर देवस्थान हिमायतनगर च्या सभागृहात भागवत कथा प्रवक्ता ह. भ. प. पुज्यादेवी श्यामप्रिया किंकरीजी श्रीधाम वृंदावन यांच्या मधुर वाणीतून श्रीकृष्ण लीलांचे वर्णन सप्ताहभर दररोज दुपारी २.०० ते ५.०० वाजेपर्यंत सांगितले जाणार आहे. या कथेची सांगता समाप्ती (काला) ०२ ऑगस्ट २०२३ रोजी होणार आहे. यावेळी शहरातील मुख्य रस्त्याने भागवत ग्रंथाची शोभायात्रा काढली जाणार आहे.
त्यानंतर दि. ०३ ऑगस्ट २०२३ रोज गुरूवार ते १० ऑगस्ट २०२३ रोज गुरुवार पर्यंत भव्य संगीतमय स्त्री संतचरित्र कथा श्री परमेश्वर मंदिर देवस्थान हिमायतनगर च्या सभागृहात प्रवचन स्त्री संतचरित्र कथा प्रवक्ता ह.भ.प. सौ. स्मिताताई आर्जेगावकर महाराज यांच्या मधुर वाणीतून सप्ताहभर दुपारी २.०० ते ५.०० वाजेपर्यंत सांगितली जाणार आहे. या कथेची सांगता समाप्ती (काला) १० ऑगस्ट २०२३ ला होऊन धोंड्याच्या महिन्यातील धार्मिक कार्यक्रमाचा समारोप भव्य महाप्रसादाने केला जाणार आहे. या धार्मिक कार्यक्रमास उपस्थित होऊन कथा श्रवणाचा लाभ घ्यावा असे आवाहन मंदिर कमिटीच्या विश्वस्तांनी प्रसिद्धी पत्रक आणि माध्यमातून केले आहे