हिमायतनगर प्रतिनिधी/-शहरात नेहमी चर्चेत असणारे तथा सामाजिक क्षेत्रामध्ये अग्रगण्य समजले जाणारे भावी नगरसेवक म्हणून हिमायतनगर तालुक्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे युवा कार्यकर्ते लक्ष्मण डांगे यांच्या सह असंख्य नव तरुण युवकांचा लवकरच भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश होणार असल्याची चर्चा हिमायतनगर शहरातील राजकीय वर्तुळात रंगत आहे…
हिमायतनगर हे तालुक्याचे ठिकाण असल्यामुळे येथील राजकीय घडामोडींना चांगलेच महत्त्व निर्माण झाले आहे नुकतेच हिमायतनगर शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती गजानन तुप्तेवार यांची भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा सरचिटणीस पदी व भाजपाच्या तालुका अध्यक्ष पदी गजानन चायल यांची जिल्हाध्यक्ष सुधाकर भोयर पाटील यांनी निवड केली तेव्हापासून हिमायतनगर शहरासह तालुक्यात भाजपा पक्ष वाढीचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे आता तर हिमायतनगर शहरातील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे भावी नगरसेवक म्हणून इतके दिवस चर्चेत असणारे युवा शिवसैनिक तथा सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणारे कार्यकर्ते लक्ष्मण डांगे यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये लवकरच जाहीर प्रवेश होणार असल्याची चर्चा हिमायतनगर शहरातील राजकीय वर्तुळात सध्या जोरदार रंगत आहे यामुळे येणाऱ्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये हिमायतनगर शहरातील भारतीय जनता पार्टीचे वर्चस्व अधिकच वाढणार असल्याची चर्चा सुद्धा होत आहे त्यामुळे येणाऱ्या काळात शहरातील दिग्गज नेत्यांचा सुद्धा भारतीय जनता पार्टीत प्रवेश होणार असल्याचे भाजपा तालुका अध्यक्ष गजानन चायल यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले आहे त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसह जिल्हा परिषद निवडणूकित आता तिरंगी लढत होणार असल्याचे राजकीय विश्लेषकांनी सांगितले आहे…