हिमायतनगर :- ( प्रतिनीधी ) | तालुक्यात कार्यरत असलेले तालूका समूह संघटक श्री कृष्णा चौधरी यांनी कुठल्याही प्रकारचा अपहार अथवा, कुण्याही आशा वर्कर कडे पैश्याची मागणी केली नाही, अश्या प्रकारचा खुलासा सादर केला आहे.
जिल्हा आरोग्य अधिकारी जि. प. नांदेड यांना सादर केलेल्या निवेदनात आशा वर्कर यांनी म्हटले आहे की, तालूका समूह संघटक श्री चौधरी हे सन २०१३ पासून कार्यरत आहेत. सर्व आशा वर्कर कार्यकर्तीकडून ग्राम आरोग्य पोषण पाणी पुरवठा व स्वच्छता समिती च्या निधीतले ५० ते ६० टक्के रक्कम घेतात हे लावलेले आरोप चुकीचे आहेत. या समितीचे पदसिद्ध अध्यक्ष हे सरपंच व सदस्य सचिव आशा असल्यामुळे समूह संघटक यांच्या या खात्याशी कुठलाच संबंध येत नाही. त्यामुळे आशा सेविकाचा या बाबत कुठलीच तक्रार नाही. तसेच प्रत्येक बिलातून पाच हजार ते दहा हजार रूपये प्रतेक बिलातून , मानधनातून घेतात, पैसे आणून द्या , म्हणतात, असे चुकीचे असून ते तश्या प्रकारची मागणी करीत नाहीत, कुठल्याही प्रकारची धमकी वजा भाषा वापरत नाहीत, व तसेच कामावरून काढून टाकण्याची धमकी देत नाहीत, व अपमानास्पद वागणूक ही देत नाहीत, समूह संघटक यांची हकाल पट्टी करा असे निवेदनात नमूद केले आहे, ते पण चुकीचे, विशेषत्वाने सर्व आरोप चुकीचे असून, पहिलेच तालूका समूह संघटक कायम ठेवण्यात यावे.
अशी मागणी जयमाला कांबळे, लता चव्हाण, गंगासागर गायकवाड,संगीता कदम, कौशल्या राठोड, वंदना गायकवाड, प्रतिभा नरवाडे, ज्योती नरवाडे, आदींसह असंख्य आशा वर्कर यांनी केली आहे.