नांदेड प्रतिनिधी |नागेश सोनुले | हिमायतनगर तालुक्यातील तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयातील तालुका समूह संघटनाकडून येथील आशा कार्यकर्त्यांना पैशाची मागणी केल्याचा आरोप येथील अशा कार्यकर्त्यांनी दिनांक २४ मे रोजी जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक राष्ट्रीय आरोग्य अभियान नांदेड व जिल्हा आरोग्य अधिकारी नांदेड यांच्याकडे लेखी तक्रारीद्वारे तक्रारी अर्ज दाखल केला होता.संबंधित अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित करावे अशी मागणी करण्यात आली. पण विशेष बाब म्हणजे त्यानंतर त्याचे खंडन म्हणून काही आशा सेविकांनी आज दि २६ मे रोजी जिल्हा आरोग्य अधिकारी यांना अजून एक निवेदन देऊन सरांनी (संबंधित अधिकाऱ्यांनी ) आम्हाला पैसे मागितले नाही असे म्हणत त्याचे खंडन केले आहे. सविस्तर वृत्त असे की, हिमायतनगर येथील ग्रामीण रुग्णालयात असलेले तालुका समूह संघटक हे २०१३ पासून तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये काम करणाऱ्या आशा कार्यकर्त्यांकडून ग्राम आरोग्य पाणीपुरवठा व स्वच्छता समितीच्या निधीमधील ५० ते ६० टक्के रक्कम जबरदस्ती मागून घेतात व त्यांच्या तुटपुंज्या मानधनामधील पाच ते दहा हजार रुपये आणून द्या अन्यथा मी तुमची तक्रार करतो असे अर्वाचं भाषेमध्ये बोलून त्यांना सर्व कार्यालयीन कर्मचाऱ्यांसमोर अपमानित करून धमकी देत असतात. जर का आम्ही पैसे दिले नाही तर दर महिन्याला ज्या वेळेस आम्ही लसीकरणाला किंवा मासिक बैठकांना हिमायतनगर येथील तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयात जातो तेव्हा आम्हाला पैसे घेऊन हिमायतनगरला या नाहीतर मी तुमची बघून घेईन अन्यथा मी तुमचे मासिक मानधन काढणार नाही. तालुक्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी, लेखापाल व जिल्ह्याचे अधिकारी हे माझ्या मर्जीतील आहेत.
त्यामुळे मी तुम्हाला कामावरून कमी करेल. अशी वारंवार धमकी देत असतात. अशा प्रकारची गैरवर्तणूक करून आमच्याकडून दर महिन्याला जबरदस्ती पाच ते दहा हजार रुपये घेणाऱ्या कर्मचाऱ्यास व स्त्रीचा वारंवार अपमान करणाऱ्या कर्मचाऱ्यावर जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी सह तालुका वैद्यकीय अधिकारी ह्या तक्रारीची दखल घेऊन सबंधित कर्मचाऱ्यांची पदावरून हकालपट्टी करावी अन्यथा त्यावर निलंबनाची कार्यवाही करावी अशी मागणी येथील आशा कार्यकर्त्यांनी केल्यानंतर येथील तालुका आरोग्य कार्यलयातील त्या कर्मचाऱ्याच्या मर्जीतील काही आशा सेविकांना मात्र ह्या तक्रारींचे खंडन केले आहे. आज दि २६ मे रोजी जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद, नांदेड यांना एक निवेदन देऊन सरानी( संबंधित अधिकारी ) कुठलेही पैसे
मागितले नाही. असे म्हणत त्याचे खंडन केले आहे. तक्रारींवर जिल्हा आरोग्य अधिकारी काय निर्णय घेतील ह्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी कुठल्याही प्रकारचे उर्वाच्च भाषेत बोलले नाही व कुठल्याही प्रकारच्या पैशाची मागणी नाही केली. अशा संबंधित अधिकार्याच्या बाजूने निवेदन देण्यात आले. यावेळी आशा कार्यकर्त्या जयमाला कांबळे, लता चव्हाण, गंगासागर गायकवाड, संगीता कदम, वंदना गायकवाड, कौशल्या राठोड, प्रतिभा नरवाडे, ज्योती नरवाडे, पुष्पा तर्फे, सूर्यकांता वाळके, सहारा शेख नजीर, प्रेमला राठोड, सुरेखा कदम, संगीता राठोड, अनुसया बोभाटे, सुनिता कल्याणकर, पंचफुला वाघमारे, अहिल्या जाधव, शिल्पा ससाने, सौमित्रा क्षीरसागर, भूलन बाई जाधव, सिंधुबाई पतंगे, पुष्पा राठोड, अश्विनी निखाते. यांच्यासह असंख्य आशा कार्यकर्त्या उपस्थित होत्या.