नवनिर्वाचित जिल्हाप्रमुख कोहळीकरांचा हिमायतनगरात सत्कार

हिमायतनगर प्रतिनिधी नागेश शिंदे/- शिंदे गटाचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाबूराव कदम कोहळीकर यांची नांदेड शिवसेना जिल्हाप्रमुख पदी नुकतीच निवड झाल्यामुळे हिमायतनगर येथील शिवसैनिकांनी कोहळीकर साहेबांचा भव्य नागरी सत्कार सोहळा संपन्न झाला. या वेळी शहर व परिसरातील मोठ्या संख्येने शिवसैनिक व कार्यकर्ते उपस्थित होते.
शिवसेना (शिंदे) गट जिल्हाप्रमुखपदी निवड झाल्यानंतर बाबुराव कदम कोहळीकर हे प्रथमच हिमायतनगर शहरात आले होते दि 6 सप्टेंबर रोज बुधवारी श्री परमेश्वर मंदिर मंगल कार्यालयात शिवसेना तालूका शाखा व युवा सेनेच्या वतीने भव्य नागरी सत्कार सोहळा पार पडला यावेळी शिवसेना तालुका प्रमुख रामभाऊ ठाकरे व त्यांच्या सर्व तमाम शिवसैनिकांनी कोहळीकर यांचा यथोचित भव्य सत्कार केला. सत्काराला उत्तर देतांना नूतन जिल्हाप्रमुख बाबुराव कदम कोहळीकर म्हणाले की महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे व हिंगोली लोकसभेचे खासदार हेमंत भाऊ पाटील यांनी मला नांदेड जिल्ह्यातील जनतेची सेवेची संधी दिली, त्या संधीचे सोने केल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही. मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांच्या माध्यमातून दोन्ही तालुक्याच्या सर्वांगिण विकासासाठी मी सदैव प्रयत्न करेल असे त्यांनी सांगितले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बालाजी राठोड यांनी केले, तर आभार दिनेश राठोड यांनी मानले. या वेळी महिला आघाडी जिल्हा प्रमुख शीतलताई भांगे ,युवा सेना जिल्हाप्रमुख संदेश पाटील हडसणीकर,माजी जिल्हा परिषद सदस्य प्र.सत्यवृत्त ढोले, संभाराव लांडगे, रामभाऊ ठाकरे, प्रतापराव देशमुख सरसमकर, बबन कदम, बाळासाहेब कदम, विवेक देशमुख, किशनराव वानखेडे, विजय वळसे पाटील,वामनराव मिराशे, गंगाराम चव्हाण, अॅड. बाळा पतंगे, गजानन हरडपकर, राजू पाटील भोयर, राम सूर्यवंशी, राजेश जाधव, राजू पाटील पिंपरीकर, नागोराव गुंडेवाड, गजानन वानखेडे, संजय चाभरेकर, लक्ष्मण जाधव, ज्ञानेश्वर पुठेवाड, वानोळे, मारोतराव सुर्यवंशी, संतोष कदम सह आदीं शिवसैनिक व युवा सैनिक मोठ्याप्रमाणात उपस्थिती होते