👉🏻पदभार स्वीकारताच शहराचे ग्रामदैवत श्री परमेश्वर महाराज यांचे घेतले दर्शन..
हिमायतनगर प्रतिनिधी नागेश शिंदे /- भोकर येथील अप्पर तहसीलदार म्हणून कार्यरत असलेले आदिनाथ शेंडे यांची हिमायतनगर येथील तहसीलदार म्हणून आज दि 17 जुलै रोजी नियुक्ती झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हिमायतनगर येथे पूर्वीचे शिंदे,गायकवाड हेच तहसीलदार म्हणून येणार असल्याची चर्चा शहरात रंगत होती पण शेंडे यांची रविवारी उशिरा शासनाने त्यांच्या बदलीचा आदेश काढला व त्यांना हिमायतनगर येथील तहसीलदार पदाचा पदभार हदगाव येथील उपविभागीय अधिकारी अरुणा संगेवार मॅडम यांनी दिला पदभार मिळताच आज सकाळी त्यांनी शहराचे ग्रामदैवत श्री परमेश्वर महाराज यांचे त्यांनी दर्शन घेऊन आपल्या कामाची सुरवात केल्याचे दिसून आले
याबाबत सविस्तर वृत्त असे की आज दिनांक 17 जुलै रोजी हदगाव येथील उपविभागीय अधिकारी अरुणा संगेवार मॅडम यांनी उद्या दिनांक 18 जुलै रोजी होत असलेल्या जिल्हाधिकारी यांच्या बैठकीसाठी श्री परमेश्वर मंदिर सभागृहाच्या मंगल कार्यालयाची पूर्वनियोजित पाहणी करून येथील महादेवाचे दर्शन घेत मंदिराच्या कामाचा आढावा घेतला यावेळी परमेश्वर मंदिर ट्रस्ट कमिटी कडून हदगाव हिमायतनगर तालुक्याच्या उपविभागीय अधिकारी तथा पूर्वीच्या तहसीलदार अरुणा संगेवार मॅडम व हिमायतनगर चे नवनिर्वाचित तहसीलदार पदाचा पदभार स्वीकारणारे आदिनाथ शेंडे सर यांचा ट्रस्ट कमिटी कडून भव्य सत्कार करण्यात आला यावेळी असे सांगण्यात आले की मागील वर्षी शेंडे यांनी भोकर शहरामध्ये अनेक नदी नाल्याना आलेल्या पुराच्या वेळी उल्लेखनीय कामगिरी केली होती. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी त्यांचे कौतुक सुद्धा केले होते त्यामुळे हिमायतनगर शहराला आता कर्तव्यदक्ष असा अधिकारी मिळाल्याने परमेश्वर मंदिर ट्रस्ट कमिटीच्या विश्वस्तांनी त्यांचे कौतुक करत त्यांचा सत्कार केला यावेळी नायब तहसिलदार ताडेवाड साहेब,मंडळ अधिकारी चव्हाण साहेब,तलाठी पुणेकर सह श्री परमेश्वर मंदिर देवस्थान कमिटीचे उपाध्यक्ष महावीर शेठ श्रीश्रीमाळ,अनंता देवकत्ते, शांतीलाल श्रीश्रीमाळ, लताताई मुलगे,श्रीमती मथुराबाई भोयर, विलास वानखेडे,संजय माने, पत्रकार नागेश शिंदे सह आदी जन उपस्थित होते