हिमायतनगर प्रतिनिधी /-काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष कोण होणार ह्याची चर्चा मागील अनेक दिवसांपासून शहरात रंगत होते त्या चर्चेला दिनांक 22 ऑगस्ट रोजी पूर्णविराम मिळाला आहे आज नांदेड येथे झालेल्या बैठकीत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटोले व मा. श्री अशोकरावजी चव्हाण साहेब माजी मुख्यमंत्री यांच्या मान्यतेनुसार व हदगाव हिमायतनगर तालुक्याचे लोकप्रिय आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांचे विश्वासू असलेले हिमायतनगर काँग्रेसचे नवनिर्वाचित तालुका अध्यक्षपदी म्हणून गजानन सूर्यवंशी तर शहराध्यक्षपदी पुन्हा फेर निवड करण्यात आलेले संजय माने यांची आज जिल्हा काँग्रेस कमिटीने निवड केली आहे या निवडीचे त्यांना पत्र देऊन प्रमुख मान्यवरांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला..

यावेळी नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, कार्यसम्राट आमदार माधवराव पाटील जवळगावकर,आमदार अमर भाऊ राजूरकर, माजी आमदार डी.पी. सावंत, काँग्रेस नेते भास्कर पाटील खतगावकर, बेटमोगरेकर,सह हिमायतनगर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जनार्दन ताडेवाढ माजी संचालक रफिक शेठ माजी नगरसेवक ज्ञानेश्वर शिंदे ,प्रथम नगराध्यक्ष अब्दुल अखिल भाई, बाकी सेट , योगेश चिलकावार ,दीपक कात्रे,पंडित ढोणे सह आदींनी नवनिर्वाचित तालुका अध्यक्ष व शहराध्यक्ष यांना पुष्पहार घालून त्यांना पुढील वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा दिल्या