नांदेड प्रतिनिधी: डॉ बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेची प्रलंबित रक्कम त्वरित विद्यार्थ्यांना मिळावी या संदर्भात स्वाधार शिष्यवृत्ती विद्यार्थी कृती समिती महाराष्ट्र राज्य मार्फत सहाय्यक आयुक्त यांना निवेदन देऊन मागणी केली आहे
त्यांनी आपल्या निवेदनात म्हंटले आहे की मागील दोन वर्षांपासून विद्यार्थी हे डॉ बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेपासून वंचित आहेत अर्ज भरून दिले असून पण काही विद्यार्थ्यांना अद्याप योजनेची कोणतीही रक्कम मिळाली नसून विद्यार्थी हे आर्थिक संकटात सापडलेले असून त्यांना आर्थिक मदतीची गरज असून डॉ बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनची प्रलंबित रक्कम विद्यार्थ्यांना देऊन त्यांचे मानसिक व आर्थिक समाधान करावे गांभीर्याने असे निवेदनात म्हटले आहे या वेळी स्वाधार शिष्यवृत्ती विद्यार्थी कृती समितीचे महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष संतोष अंभोरे,लक्ष्मण वाठोरे, विशाल भालेराव,सतीश महामुने, प्रेमानंद सूर्यवंशी,नागराज कोल्हे,नरवाडे चांद्रमानी,दीपक माने,गजानन नरवाडे,अरुण राजकोर, कवडे चेतन,खिलारे लकी,वानकर बस्वराज, गायकवाड अक्षय, विक्रम पवार, गायकवाड अभिजित,संतोष मगर यांच्यासह नांदेड शहरातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. # सत्यप्रभा न्यूज # नांदेड