-पुणे येथील आंदोलनात नांदेड जिल्ह्यातून असंख्य विद्यार्थी सहभागी होणार–सतीश गोपतवाड
हिमायतनगर प्रतिनिधी/- तालुक्यासह जिल्हयात, राज्यात जिल्हापरीषदेच्या, महानगर पालिकेच्या व अनुदानित/विनाअनुदानित संस्थेच्या शाळेत शिक्षकाच्या 67,000 जागा रिक्त असल्यामुळे विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये या ऊदात्त हेतुने शासनाच्या शालेय शिक्षण, क्रिडा विभागाने शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी चे 22 फेब्रुवारी 2023 ते 3 मार्च 2023 दरम्यान आयोजन केलेले असुन 24 मार्च रोजी निकाल पण घोषित केला, निकाल घोषित करून तब्बल चार महिन्यांचा कालावधी लोटत असुन वित्त विभागाने रिक्त असलेल्या 67000 जागांपैकी 55,000 जागा भरण्याची परवानगी दिलेली असुन शासनाने अभियोग्यता धारकांना अद्यापही रुजू न करता सेवानिवृत झालेल्या शिक्षकांना तात्पुरती म्हणुन कंत्राटी बेसवर २० हजार रुपये मानधनावर घेण्याचा महाप्रतापी निर्णय लादून राज्यातील डि.एड,बीएड झालेले आणि शिक्षण पात्रता परीक्षा पास झालेल्या असंख्य अभियोग्यता धारकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा हा एकप्रकारे जुलुमच असल्याचे फास्ट्रॅक गणित/बुद्धिमत्ता पुस्तकाचे लेखक प्रा.सतीशजी वसे यांनी म्हटले आहे. शासनाने या बाबीचा गांभीर्याने विचार करावा म्हणुन १७ जुलै रोजी पुणे येथे शिक्षण आयुक्तालय कार्यालय व तर १९ जुलै रोजी मुंबई येथे लोकशाही मार्गे आंदोलनाचा ईशारा डी टी एड बी एड स्टुडंट असोशियशन सह विविध संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.
सेवानिवृत झालेल्या ७० वर्षापर्यतच्या शिक्षकाना कंत्राटी पध्दतीवर तात्पुरती नियुक्ती देण्याचा निर्णय शासनाच्या शालेय शिक्षण, क्रिडा विभागाने ७ जुलै रोजी घेतला आहे. जिल्हापरीषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिका-याना नियुक्तीचे अधिकार दिल्याचे कळताच राज्यभरातील डिएड, बीएड झालेले आणि शिक्षक पात्रता परीक्षा ऊतीर्ण झालेल्या हजारो विद्यार्थ्यामधुन तीव्र संताप व्यक्त होत आहे. शासनाने पुर्वीपासुनच वयाच्या ५८ व्या ६० व्या वर्षी वयोमाना नुसार सेवानिवृती दिली आहे. पुर्वी पासुन अशा वया पर्यत सेवानिवृती देण्याला ठोस असे धोरण असेलच ना. महाराष्ट राज्यात डिएड,बीएड,टिईटी झालेले हजारो विद्यार्थी बेकारीच्या खाईत लोटल्या गेल्याचे दिसते चित्र असताना शासनाने असे निर्णय घेऊन सुशिक्षीत बेकाराना कुठे नेऊन ठेवताय…. म्हणण्याची वेळ आल्याच्या संतप्त भावना व्यक्त होत आहेत. डीएड, बीएड, टीईटी झालेल्या राज्यातील दोन लाख विद्यार्थ्याचा गांभीर्याने विचार शासनाने करावा म्हणुन शिक्षण आयुक्तालय पुणे येथे १७ जुलै तर मुंबई येथे १९ जुलै रोजी 1)पवित्र पोर्टल वर नोंदणी प्रक्रिया तात्काळ सुरू करण्यात यावी. २) ५५,००० पदांची शिक्षक पदभरती करण्यात यावी. ३) विभागीय भरती गुणवत्ता यादी लावण्याचा शासनाच्या विचाराधीन असल्यास तो निर्णय रद्द करण्यात यावा, केंद्रीय पद्धतीने गुणवत्ता यादी लावण्यात यावी. ४) प्रतीक्षा यादी लावण्यात यावी. ५) सर्वच प्रवर्गाचा अनुशेष भरून काढण्यात यावा आणि ज्या प्रवर्गाच्या जागा अतिरिक्त असतील त्यांचा प्रश्न तातडीने मार्गी लावून त्यांना त्यांच्या टक्केवारी नुसार जागा देण्यात याव्यात ह्या मुख्य मागण्यांसंदर्भात डी टी एड बी एड संघटने सह विविध संघटनेच्या वतीने बेमुदत उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे फास्ट्रॅक गणित/बुद्धिमत्ता पुस्तकाचे लेखक प्रा.सतीशजी वसे यांनी दैनिक एकमत शी बोलताना सांगितले….
शासनाने घोषित केलेल्या शिक्षक भरती च्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी महाराष्ट्रातील २,१६,४४० डीएड बीएड, पदवी, पदव्यूत्तर शिक्षणासह नेट, सेट, पीएच डी पास असलेल्या अभियोग्यता धारकांनी परिक्षा दिली असून निकाल घोषित होऊन ४ महिन्याचा कालावधी लोटत असला तरी शासनाने अजून रूजू केले नसल्यामुळे शासनाच्या नाकर्तेपणामुळे १७ जुलै रोजीच्या पुणे येथील आंदोलनात सर्व अभियोग्यता धारकांनी आपल्या न्याय हक्कासाठी उपस्थित राहून लढणे अत्यावश्यक आहे असे सतिश परमेश्वर गोपतवाड (एम.एस्सी. बी.एड. सी.टी.ई.टी.पास अभियोग्यता धारक) विद्यार्थ्यांनी सांगितले आहे