हिंगोली – शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रोज दीड ते दोन हजार शेतकरी हळद विक्रीसाठी घेऊन येतात. त्यांना रात्रीच्या वेळी जेवणासाठी दूर अंतरावर जावे लागते. ही माहिती मिळाल्यानंतर मी कृषी उत्पन्न बाजार समितीस प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. तेथील शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेत थेट राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे यांच्याशी संपर्क केला आणि त्यांना येथील समस्यांची माहिती दिली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी संबंधित विभागामार्फत प्रस्ताव पाठवा मी निधी देतो असा शब्द दिला होता. त्याच दिवशी मी शेतकऱ्यांकरिता ‘मायेची शिदोरी’ हा उपक्रम सुरु केला. बघता बघता ९ दिवस संपले. या दरम्यान ९ हजार ९७० शेतकरी बांधवांनी मायेची शिदोरी या माझ्या उपक्रमाचा लाभ घेतला. या माध्यमातुन का होईना शेतकरी बांधवांची सेवा करता आली याचे मनापासून समाधान वाटले. आज या उपक्रमाची सांगता झाली. तरी देखील बाजार समितीमध्ये आलेल्या शेतकऱ्यांना अगदी माफक दरात राहण्याची, जेवण्याची, स्वच्छतागृहाची सुविधा मिळाव्यात याकरिता शासनाकडुन तातडीने १६ कोटी रुपयांचा निधी मंजुर करुन घेतला आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांसाठी वरील सुविधा लवकरात लवकर मिळवून देण्याकरिता मी पाठपुरावा करत आहे. # सत्यप्रभा न्यूज # नांदेड