नांदेड दि.२७: सरकारी नोकरभरती खाजगी कंपन्यांमार्फत करण्यात येणार आहे. तसेच सरकारी शाळा खाजगी कंपन्यांना चालवायला देण्याच्या हालचाली राज्य सरकारकडून केल्या जात आहे. 7 सप्टेंबर रोजी चा राज्य सरकार जो निर्णय घेतला आहे तो निर्णय शासनाने तत्काळ रद्द करावा ह्यासाठी ६ ऑक्टोबर रोजी महात्मा जोतिराव फुले पुतळा, आय.टी.आय ते जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड निषेध मोर्चा काढणार असल्याचे निर्णय शासकीय विश्रामगृह नांदेड येथे बैठकीत कृती समिती तर्फे घेण्यात आला आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात सुशिक्षित बेरोजगार तरूणांची संख्या आहे, त्यांच्या हाताला रोजगार नाही, सरकारी नोकरीचे खाजगीकरण केल्यास सर्वसामान्यांच्या मुलांनी शिकून जायचे कुठे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. खाजगी कंपनीमार्फत होणारी नोकर भरती तत्काळ रद्द करावी व इतर मागण्या घेऊन राज्य शासनाच्या धाेरणाविरोधात खासगीकरण कंत्राटीकरण विरोधी कृती समिती,नांदेड आंदोलन करणार असल्याचे आज निश्चित केले आहे, तसेच जिल्ह्यातील तमाम सरकारी नोकरी लागण्यासाठी अभ्यास करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना या मोर्च्यात लाखोच्या संख्येने उपस्थित राहावे असे कृती समितीने आव्हान केले आहे. #सत्यप्रभा न्यूज #नांदेड