हिमायतनगरः आपल्या देशाचा कारभार ज्या राष्ट्रीय ग्रंथाच्या आधारावर चालतो तो म्हणजे “भारतीय संविधान” आणि त्याच संविधानाची गळचेपी करण्याचा प्रयत्न व संविधानिक तत्वांना न जुमानता मनमानी पद्धतीने देशाचा कारभार वर्तमान केंद्र सरकार कडुन सुरु आहे. हे असंविधानिक वातावरण संपवण्यासाठी आपण जागृत भारतीय नागरीक म्हणून समोर येणे काळाची गरज आहे. तरी अखिल भारतीय काँग्रेस कमिटी,अनुसुचित जाती विभाग यांच्या वतीने हाती घेण्यात आलेल्या “संविधान रक्षक” या देशव्यापी अभियानात सहभागी व्हा आणि संविधानविरोधी शक्तींना आपली लोकशाही ताकत दाखवा असे आवाहन हिमायतनगर तालुक्यातील जनतेला संतोष आंबेकर तालुकाध्यक्ष, हिमायतनगर काँग्रेस कमिटी,अनुसुचित जाती विभाग यांनी केले आहे.
तसेच येणाऱ्या काळात ज्या गावात जास्त नोंदणी “संविधान रक्षक” या अभियानात होईल त्या गावातील काँग्रेस कार्यकर्त्यांचा तालुका कमिटीतर्फे २६ नोव्हेंबर ला संविधान दिनी भारतीय संविधान भेट देऊन सत्कार करण्यात येईल अशीही घोषणा त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केली. #सत्यप्रभा न्यूज #नांदेड
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!