हिमायतनगर प्रतिनिधी नागेश शिंदे/- प्रभू श्री राम जन्मोत्सव संपूर्ण देशात मोठ्या आनंदात व हर्ष उल्हासात साजरा करण्यात येत आहे त्याचेच औचित्य साधून दि 16 एप्रिल रोजी सकाळी शहरातील रामभकत्त महिलांनी श्री परमेश्वर मंदिर देवस्थान येथील परमेश्वर महाराजांचे देखणे रूप प्रभू रामचंद्राच्या रूपामध्ये सजवून शहरातील भाविक भक्तांच्या दर्शनासाठी खुले केले आहे हे प्रभू रामचंद्राचे रूप पाहण्यासाठी पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी हिमायतनगर (वाढोणा) शहरातील परमेश्वर मंदिर येथे मोठी गर्दी होत असल्याचे पाहायला मिळत आहे.
या बाबत सविस्तर वृत्त असे की रामनवमीच्या यंदाच्या उत्सवाला रामजन्मभूमीवर अतिशय देखणे मंदिर अयोध्या येथे उभे राहिल्याने रामलल्ला आपल्या मूळ स्थानी विराजमान झाल्याच्या मंगलमय प्रसंगाच्या पार्श्वभूमी ह्यावर्षी श्रीराम लल्लाचे दर्शन सर्वांना वाढोणा येथेच घडावे या उद्देशाने तीन राज्यात प्रसिद्ध असलेल्या हिमायतनगर शहरातील श्री परमेश्वर मूर्तीची श्रीराम स्वरूप अशी फुलांनी आरास व आकर्षक सजावट करत शहरातील रामभक्त महिला सुनंदा दासेवार, उषाताई देशपांडे, मुक्तताई बेदरकर, सुशीलाताई निम्मेवाड , इंदूताई शिखरे, नंदाबाई इंगळे या महिलांनी दि 17 एप्रिल रोजी राम नवमीच्या पार्श्वभूमीवर सकाळी 5 वाजता श्री परमेश्वर महाराजांचा अभिषेक व पूजा करून वाढोणा नगरीतील भाविक भक्तांना राम नवमी निमित्त प्रभू रामचंद्राचे दर्शन घडावे यासाठी दोन तास मेहनत घेऊन प्रभू श्रीराम लल्लाची हुबेहूब सजावट करून पंचक्रोशीतील भाविक भक्तांना हा नयनरम्य देखावा पाहण्यासाठी आव्हान केले आहे यावेळी रामभक्त महिला सुनंदा दासेवार, उषाताई देशपांडे, मुक्तताई बेदरकर, सुशीलाताई निम्मेवाड , इंदूताई शिखरे, नंदाबाई इंगळे सह आदींनी प्रभू श्रीराम चंद्राचा जयघोष करत सर्व राम भक्तांना व भाविक भक्तांना राम नवमीच्या शुभेच्छा दिल्या.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड