👉🏻 मौजे धानोरा येथील शेतकऱ्यांचा सौदा चिट्टी झालेला रस्ता आडवणाऱ्या वर कठोर कारवाई करा.
हिमायतनगर प्रतिनिधी /- तालुक्यातील मौजे धानोरा येथील शेत सर्वे नंबर 13 मध्ये असलेल्या शेत जमिनी ला जाण्या येण्याकरिता मागील चार ते पाच वर्षांपूर्वी सौदा चिट्ठी करून कायम स्वरुपी विकत घेऊन सुद्धा संबंधित शेतमालकाच्या मुलांकडून शामराव उकडजी कवडे यांची अडवणूक होत असल्यामुळे आज दि 7 जुलै रोजी हिमायतनगर येथील तहसीलदार यांच्या कडे धानोरा येथील शेतकऱ्यांने हा रस्ता मला मोकळा करून संबंधित रस्ता अडवणूक करणाऱ्यावर तात्काळ कठोर कारवाई करावी यासंदर्भात प्रशासनास निवेदन देऊन मागणी केली आहे
याबाबत सविस्तर वृत्त असे की मागील चार ते पाच वर्षांपूर्वी सौदा चिट्ठी लिहून देणार आडेलु पिता किशन तुळशे यांनी मौजे धानोरा येथील सौदा चिट्ठी लिहून घेणार शामराव पिता उकडजी कवडे यांनी शंभर रुपयांच्या बॉण्डवर अंदाजे नगदी 31 हजार रुपये देऊन संबंधित गट क्रमांक 13 मध्ये जाण्या येण्यासाठी सौदा चिट्ठी करून कायमस्वरूपी रस्ता विकत घेतला होता त्या वेळेपासून संबंधित शेतकरी रोज त्या रस्त्याने ये जा करून आपल्या शेतीमध्ये पीक पेरणी करायचे परंतु आता संबंधित शेतकऱ्याच्या मुलांकडून किशोर आडेलु तुळसे यांच्याकडून एन पेरणीच्या दिवसांमध्ये सबंधित शेतकऱ्यास व त्यांच्या कुटुंबास वारंवार रस्ता अडवण्याचां प्रयत्न करून वाद घालत आहेत त्यामुळे तहसिलदार साहेबांनी तात्काळ सबंधित तलाठी व मंडळ अधिकारी यांना आदेशित करून शेतीस जाण्या-या शेतकऱ्याचा रस्ता तात्काळ मोकळा करून न्याय देण्यात यावा या मागणीसाठी दिनांक सात जुलै रोजी हिमायतनगर येथील तहसीलदार यांच्याकडे शामराव उकडजी कवडे या शेतकऱ्याने मागणी केली आहे