नांदेड: शेतकरी नेते तथा शेतकरी-कष्टकरी संघर्ष आघाडीचे संयोजक कैलास येसगे कावळगावकर यांच्या नेतृत्वाखाली देगलूर येथून शेतकरी, कष्टकरी व दिव्यांग बांधवांच्या विविध मागण्यांसाठी किसान-कामगार संवाद यात्रेची सुरुवात करण्यात आली. या संवाद यात्रेत प्रामुख्याने अतिवृष्टी शेतकऱ्यांना तात्काळ अनुदान वाटप करा, नुकसान आधारित पिक विमा मंजूर करा, शेतकऱ्यांना 24 तास मोफत वीज उपलब्ध करून द्या, तेलंगणाच्या धर्तीवर शेतकऱ्यांना पेरणीपूर्व एकरी दहा हजार रुपये अनुदान द्या, शिक्षणाचे कंत्राटीकरण व खाजगीकरणाचा निर्णय तात्काळ रद्द करा, दिव्यांग व निराधार बांधवांना तीन हजार रुपयांचे अनुदान द्या अशा विविध मागण्यांबाबत प्रबोधन करून शासन व प्रशासनाकडे पाठपुरावा केला जाणार आहे. या संवाद यात्रेत शेकडो शेतकऱ्यांसह वारकरी व दिव्यांग बांधव सुद्धा सहभागी झाले होते.
देगलूर बिलोली तालुक्यातील गाव गाव प्रबोधन करत ही संवाद यात्रा आज माननीय जिल्हाधिकारी कार्यालयासमोर येऊन जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले. #सत्यप्रभा न्यूज #नांदेड