हिमायतनगर प्रतिनिधि नागेश शिंदे /-तालुक्यातील हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालयातील इतिहास विभाग प्रमुख प्रा.डॉ. वसंतराव व्यंकटराव कदम यांचे द्वितीय चिरंजीव विश्वजीत याने नुकत्याच झालेल्या नीट 2023 च्या परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात 720 पैकी 660 मार्क्स घेऊन all India rank मध्ये 4465 क्रमांक प्राप्त करून नेत्रदीपक यश संपादन केले त्यांच्या या यशाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे
विश्वजीत कदम हे स्वभावाने अतिशय शांत, हुशार संयमी असुन त्याचे शिक्षण कोणत्याही महागड्या इंग्लिश स्कूल मध्ये झालेले नसून सेमी इंग्रजी माध्यमातुन प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिमायतनगर, तर माध्यमिक शिक्षण सावित्रीबाई फुले माध्यमिक शाळा आणि ज्ञान भारती ज्युनिअर कॉलेज नांदेड येथे झाले. दहावीच्या परीक्षेत त्याने 95 % गुण प्राप्त करून 2023 मध्ये बारावीची परीक्षा दिल्यानंतर यावर्षीच्या नुकत्याच जाहीर झालेल्या नीट 2023 च्या परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात 720 पैकी 660 मार्क्स घेऊन all India rank 4465 वा क्रमांक प्राप्त करून विश्वजीत ने नेत्रदीपक यश संपादन केले व एमबीबीएस साठी तो पात्र ठरलेला आहे ही हिमायतनगर तालुक्यासाठी अभिमानाची व गौरवाची बाब आहे. हिमायतनगर आणि परिसरातुन नीट मध्ये एवढे गुण घेणारा हा पहिलाच विद्यार्थी असल्याने विश्वजीतच्या यशाच्या पाठीमागे त्याचे आई, वडील, भार्गव राजे सर तसेच मोठा भाऊ विष्णू वसंतराव कदम (एमबीबीएस, अकोला) .यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले त्याचबरोबर शिक्षकांचे सर्वोत्तम मार्गदर्शन त्याचा आत्मविश्वास जिद्द चिकाटी मुळे ,त्याने घेतलेली कठोर मेहनत, नियमित 12 तास अभ्यासाच्या बळावर हे यश त्याने संपादन केले आहे. तसेच जेईई परीक्षेत सुध्दा त्याने 95.50% गुण घेतल्यामुळे हिमायतनगर येथील हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालयाच्या संचालिका माजी केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांताताई पाटील, हदगाव हिमायतनगर तालुक्याचे लोकप्रिय आमदार माधवराव पाटील जवळगावकर, माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर,लोकनेते बाबुराव कदम कोहळीकर सह माजी नगराध्यक्ष कुणाल राठोड, हुतात्मा जयंतराव पाटील महाविद्यालयाच्या प्राचार्य प्रा.डॉ. उज्वला सदावर्ते मॅडम, गजानन चायल ,विलास वानखेडे सह पत्रकार दत्ता शिराने,परमेश्वर गोपतवाड, नागेश शिंदे यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या…