नांदेड: नांदेड शहरातील जुने श्री गुरुगोविंदसिंघजी शासकीय रुग्णालय जिल्हा रुग्णालयाला एक हजार खाटांचे करून अत्याधुनिक सोई सुविधेसह तात्काळ सुरू करण्यात यावे, शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय विष्णुपुरी येथील औषध पुरवठा सर्वच टेंडर यातील भ्रष्टाचाराची व त्याच बरोबर येथे घडलेल्या रुग्ण हत्याकांडाची उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशामार्फत चौकशी करण्यात यावी. तसेच रुग्णांच्या मृत्यूप्रकरणी जबाबदार असणाऱ्या डॉक्टर कर्मचारी यांच्यावर कारवाई करावी, रुग्णालयात स्टंटबाजी करत अधिष्ठातांना शौचालय साफ करण्यास लावल्याप्रकरणी हिंगोली चे खासदार हेमंत पाटील यांच्यावर अॅट्रॉसिटी अॅक्ट अंतर्गत दाखल झालेल्या गुन्ह्यात त्यांना तात्काळ अटक करावी, वैद्यकीय महाविद्यालयातील वर्ग चार कर्मचाऱ्यांची सर्व पदे त्वरित भरण्यात यावीत, सरकारी व खाजगी रुग्णालयातून रेफर केलेल्या रुग्णांच्या प्रकृतीबाबत परिपूर्ण माहिती रेफर करणाऱ्या डॉक्टरांनी रुग्णांच्या नातेवाईकाला लेखी द्यावी यासह विविध मागण्यांसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालया समोर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ‘जवाब दो’ आंदोलन करण्यात आले यावेळी शकडो कार्यकर्ते उपस्थित होते. #सत्यप्रभा न्यूज #नांदेड