संभाजीनगर दि.१८: अँड.प्रकाश आंबेडकर साहेब यांनी छ.संभाजी नगर जिल्ह्यातील औरंगजेबाची कबर आणि भद्रा मारुती मंदिर या दोन ठिकाणी भेटी दिल्या त्यानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते मंदिराच्या असणाऱ्या ट्रस्टीनी पूजा करून घेतील आम्ही जे आता शिबिर घेतलेले आहे महाराष्ट्रातील सर्वच कार्यकर्ते या ठिकाणी आलेत मंदिराचे काम काम सुरू आहे. मंदिराला त्याकरीता भेट दिली. आपली श्रद्धा आहे की नाही सर्वांचा श्रद्धेचा धर्माचा सन्मान राखला पाहिजे लोकांच्या ज्या श्रद्धा आहे त्या श्रद्धेचा सरकारने अपमान करू नये लोकांच्या श्रद्धेचा आदर झाला पाहिजे. हेच आम्हाला वाटतं.
औरंगजेबा वरून वादंग निर्मान होऊन सुद्धा आपण त्या ठिकाणी भेट दिली असा प्रश्न माध्यमांनी विचारला असता प्रकाश आंबेडकर म्हणाले की ज्यांनी वादंग निर्माण केलेला आहे त्यांनी स्वतःच चरित्र बघावं, औरंगजेबच्या दरबारामध्ये कामाला होते का नाही नोकऱ्या करत होते का नाही आम्ही त्या ठिकाणी चोपदारही नव्हतो. त्यामुळे लोकांना शहाणपण शिकून नये आपला इतिहास बघावा असा टोलाही यावेळी वादंग निर्माण करणाऱ्याना त्यांनी लगावला. बाबासाहेबांनी या सर्वांना उद्देशून म्हटलं होतं जुन्या राजवटीच्या कालावधीमध्ये जयचंद निर्माण झाले आणि जयचंद यांनी परदेशी लोकांना आपल्या राज्यात आणले होते. हे आम्हाला प्रश्नचिन्ह करतात तर पहिले तुम्ही याचा खुलासा करा की जय कोण? असा सवाल यावेळी त्यांनी केला.
अँड.प्रकाश आंबेडकर साहेब यांनी छ.संभाजी नगर जिल्ह्यातील औरंगजेबाची कबर आणि भद्रा मारुती मंदिर या दोन ठिकाणी भेटी देऊन सामाजिक समतेचा संदेश दिला आहे.तो आताच्या चाललेल्या राज्याच्या परिस्थितीला मोलाचा ठरणार आहे. # सत्यप्रभा न्यूज # नांदेड