नांदेड | प्रेमापोटी कोण काय करेल याचा काही नेम नसतो. याचाच प्रत्यय छत्रपती संभाजी नगरमधील एका तरुणीला आला आहे. लग्नाचे आमिष दाखवून छत्रपती संभाजीनगर येथील एका २२ वर्षीय तरुणीवर नांदेडच्या तरुणाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पीडित तरुणीच्या तक्रारीवरुन शिवाजीनगर पोलिसांनी त्या तरुणाविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.
धक्कादायक म्हणजे आरोपीने पीडित तरुणीला हैदराबादला नेऊनही अत्याचार केला होता. २२ वर्षीय पीडित तरुणी ही मूळ अमरावती येथील रहिवासी आहे. मागील काही वर्षांपासून ती छत्रपती संभाजीनगर येथे एकटी वास्तव्यास होती. या दरम्यान ती एका कंपनीमध्ये कॉम्प्युटर ऑपरेटर म्हणून काम देखील करत होती. याच कंपनीत नांदेड शहरातील सराफ भागात राहणारा अब्दुल्ला सईद हा देखील काम करायचा. या दरम्यान दोघात मैत्री झाली. मैत्रीच रूपांतर प्रेमात झालं.
त्यानंतर आरोपीने लग्नाचं आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार करत राहिला. तीन वर्ष आरोपी पीडित तरुणीवर वारंवार अत्याचार करत राहिला. धक्कादायक बाब म्हणजे त्या आरोपीने पीडित तरुणीला हैदराबादला नेऊन अत्याचार केला होता. अनेकवेळा लग्नाची मागणी तरुणीकडून केली जात होती. मात्र, नेहमी तो टाळत होता. अखेर परीक्षा देण्यासाठी नांदेडला आलेल्या तरुणीला आपली फसवणूक झाल्याचे समजले. त्यांनतर तिने थेट शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
पोलिसांनी पीडित तरुणीच्या फिर्यादीवरुन अब्दुल्ला सईद विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आरोपीला ताब्यात देखील घेतले आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक पुणे हे करीत आहेत. पीडित तरुणीने आपला प्रियकर नांदेड येथे राहत असल्याने तिने नांदेडमध्ये मुक्त विद्यापीठात एम कॉमसाठी प्रवेश घेतला होता. दोन वर्षापासून नांदेडमध्ये शिक्षण घेत आहे. परीक्षेच्या वेळी ती नांदेडला राहत होती. सद्या ती एम कॉमच्या द्वितीय वर्षाची परीक्षा देत आहे.
परीक्षेदरम्यान आरोपीने लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केला असं पीडित मुलीने आपल्या तक्रारीत म्हटलं आहे. # सत्यप्रभा न्यूज # नांदेड