नांदेड(प्रतिनिधी)-आज रेल्वे स्थानकाच्या महिला प्रतिक्षालयात लपून बसलेल्या अतिरेक्यांची माहिती मिळाल्यानंतर पोलीस उपअधिक्षक सुशिलकुमार नायक यांच्या नेतृत्वात मोठ्या पोलीस फौजफाट्याने तीन अतिरेक्यांना जीवंत पकडले आणि एक पळून जात होता तेंव्हा त्याच्यावर पोलीस विभागाने गोळीबार करून त्यास कंठस्नान घातले.ही सर्व रंगीत तालीम होती.
आज सकाळी चार अतिरेकी स्फोटकांसह रेल्वे स्थानकाच्या महिला प्रतिक्षालयात लपून बसल्याची माहिती नियंत्रण कक्षाने जारी करताच पोलीस उपअधिक्षक सुशीलकुमार नायक यांच्या नेतृत्वात क्युआरटी, बीडीडीएस, एटीसी, एटीबी, फायरब्रिगेड, जीआरपी, आरपीएफ आणि ऍबुलन्सला माहिती देण्यात आली. त्वरीत प्रभाने क्युआरटीचे 2 अधिकारी, 33 अंमलदार, एटीएसचे 3 अधिकारी, 7 अंमलदार, एटीबीचे 2 अधिकारी, 10 अंमलदार, पोलीस ठाणे वजिराबादचे 2 अधिकारी 20 अंमलदार, आरपीएफचे 2 अधिकारी आणि 7 अंमलदार, जीआरपीचे 3 अधिकारी आणि 11 अंमलदार हजर झाले.
स्फोटकांसह असलेल्या अतिरेक्यांना पकडणे मोठे आव्हान आहे. या आव्हानाला स्विकारून पोलीस दलाने 11 ते 12 वाजेदरम्यान विविध खलबते रचून अतिरेक्यांना घेरले. त्यात तिन अतिरेक्यांना पोलीसांनी जीवंत पकडले. एक अतिरेकी पळून जात असतांना पोलीसांनी त्याला कंठस्नान घातले. ही सर्व रंगित तालीम होती. # सत्यप्रभा न्यूज # नांदेड