लातूर प्रतिनिधी | विजय पाटील |
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स असोसिएशन च्या वतीने देण्यात येणारा मानाचा कै.वैकुंठभाई मेहता उत्कृष्ट जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पुरस्कार-2022′ मराठवाडा विभागात लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला नाशिक येथे भारताचे माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते शानदार सोहळयात लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी स्वीकारला असून लातूर जिल्हा बँकेला मिळालेल्या पुरस्काराने लातूर बँकेचा सहकार पॅटर्न मध्ये मानाचा तुरा रोवला असून बँकेची सहकार क्षेत्रात दैदीप्यमान वाटचाल सूरू आहे