हदगाव: हदगाव तालुक्यातील मौजे कवाना येथील सामाजिक कार्यकर्ते तुषार कांबळे व सत्यजित प्रधान यांनी सर्व सामान्य माणसाला होनारा नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचे तालूक्याचे गटविकास अधिकारी यांच्या कडे निवेदन मार्फत मागणी केली. सदरील कामचोर ग्रामसेवक अधिकारी हजर राहत नाही, गावात हजर न राहता पगार उचलत आहेत गावामध्ये प्रशासनाने नेमून दिलेल्या तारखेस ग्रामसभा होत नाहि कायद्याप्रमाणे ग्रामपंचायत कडे . माहिती अधिकारा मार्फत मागणी केली असता सदरील माहिती रजिस्टरी करून पाठवले असता रजिस्ट्री माहिती सुद्धा त्यांनी स्वीकारली नसून वापस आल्याचे दिसून आले आहे. कवाना या गावातील लोकांना विद्यार्थी विद्यार्थिनीला शैक्षणिक कागदपत्रे काढण्यासाठीअडचणी सामना करावा लागत असल्याचे दिसून येत आहे. लाईट , रस्त्ता,नाल्या,पिण्याच्या पाण्याची समस्या स्मशानभूमीच्या समस्या अशा वेगवेगळ्या समश्याशी कवाना येथील नागरिकांना अशा विविध अडीअडचणीच्या व कागदपत्रे ग्रामपंचायत मध्ये ग्रामसेवक विना मिळत नसल्याचा नागरिकांना नाहान त्रास सहन करावा लागत आहे याकडे प्रशासनाने तात्काळ चौकशी करून ग्रामसेवकावर कारवाई करून न्याय देण्याचे काम करावे असे गावातील नागरिकांमधून बोलले जात आहे. #सत्यप्रभा न्यूज #नांदेड