हिमायतनगर प्रतिनिधी नागेश शिंदे/-सध्या शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) वतीने ‘होऊ द्या चर्चा’ या अभियानाच्या माध्यमातून या बोलघेवड्या केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना तसेच निष्क्रिय कारभाराचा भांडाफोड करण्यात साठी १ ते १२ ऑक्टोबर दरम्यान हिंगोली लोकसभेचे माजी खासदार सुभाष वानखेडे साहेब व हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघात शिवसेना जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम प्रत्येक गाव, खेड्यांत होणार आहे. आज दि 8 ऑक्टोंबर रोजी शहरातील श्री परमेश्वर मंदिर देवस्थान समोर हा कार्यक्रम पार पडला यावेळी गावातील ज्येष्ठ नागरिक व युवकांनी कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला यावेळी महाराष्ट्र राज्याचे युवा सेना विस्तारक कृष्णा पाटील, सोशल मीडिया राज्य समन्वयक अयोध्या ताई पौळ,विधानसभा संपर्क प्रमुख सचिन चराटे ,बळीराम देवकते,प्रभाकर पत्तेवार,सुभाष जाधव यांनी मार्गदर्शन केले या ठिकाणी खुलेआम चर्चा करण्यात आली. यावेळी नागरिकांनी मिंधे सरकार व स्थानिक हिंगोली लोकसभेचे गद्दार खासदार हेमंत पाटील यांच्याविरोधी नाराजी व्यक्त केली…
या बाबत सविस्तर वृत्त असे की शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने व संकल्पनेतून संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यात येणाऱ्या ‘होऊ द्या चर्चा’ या अभियानास हिमायतनगर शहरात दि 8 ऑक्टोंबर रोज रविवार पासून सुरुवात झाली आहे यावेळी महाराष्ट्र राज्याचे युवा सेना विस्तारक कृष्णा पाटील, सोशल मीडिया राज्य समन्वयक अयोध्या ताई पौळ,विधानसभा संपर्क प्रमुख सचिन चराटे ,बळीराम देवकते,प्रभाकर पत्तेवार,सुभाष जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रथमत: नांदेड जिल्हा रुग्णालयात मृत्यू पावलेल्या चिमुकल्यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. नांदेड येथील रुग्णालयात झालेल्या घटनेबद्दल बोलताना महाराष्ट्र राज्याचे युवा सेना विस्तारक कृष्णा पाटील आष्टीकर म्हणाले की, जिल्हा रुग्णालयात सध्या तापीच्या गोळ्या मिळत नाहीत, तर तेथे आवश्यक कर्मचारी नाहीत, मिंधे गटाचा निधी जाहीर होतो आणि तेवढा पैसा जातो कुठे, भाजपा सरकार फक्त आश्वासनांची खैरात करत आहे. प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख, दोन करोड नोकऱ्या देणार, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार, शेतकरी- आत्महत्या करत आहेत, आयुष्यमान योजना, २०२२ पर्यंत सर्वांना घरे देणार, अशा खोट्या आश्वासनांची खैरात करणाऱ्या भाजपाचा खोटारडेपणा सर्व सामान्यापर्यंत पोचविण्याचे काम आपल्या मतदारसंघातील शिवसैनिकांनी केले पाहिजे नुसता हिंदुत्वाचा खोटा पुळका दाखुन पोट भरत नाही मु,मैं राम , हाथोको काम हे आमच्या शिवसेनेचे हिंदुत्व आहे असे म्हणत कृष्णा पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले यावेळी सोशल मीडिया राज्य समन्वयक अयोध्या ताई पौळ,विधानसभा संपर्क प्रमुख सचिन चराटे यांनाही मार्गदर्शन केले त्यानंतर “होऊ द्या चर्चा “च्या माध्यमातून शिवसेनेच्या अयोध्याताई पौळ यांनी बाजार पेठेतील काही दुकानला भेटी दिल्या यावेळी एका अपंग पांन टपरी व्यावसायिकाला ,चहा विक्रेता व सलून दुकानात जाऊन त्यांच्याशी चर्चा केली व भाजपाच्या खोटारड्या आश्वासनाचा पाढा त्यांनी त्यांच्यासमोर वाचून दाखवला
यावेळी दिगंबर कदम उपजिल्हा प्रमुख,विधानसभा संघटक अवधूत देवसरकर,शिवसेना तालुका प्रमुख हदगाव सुभाषराव जाधव,मुधोलकर सर,राजू पाटील हडसणीकर,खरेदी विक्री संघाचे चेअरमन बळीराम देवकत्ते,पत्तेवार सावकार,शिवसेना तालुका संघटक संजय
काईतवाड,विशाल राठोड,ज्येष्ठ शिवसैनिक विठ्ठल ठाकरे माजी नगराध्यक्ष कुणाल राठोड,शिवसेना
उपतालुका प्रमुख विलास वानखेडे,गजानन देवसरकर,बाळू अण्णा चवरे,शहर प्रमुख प्रकाश रामदिनवार, राम नरवाडे, सावन डाके,संतोष पुलेवार,गोविंद
आडे,युवा सेना तालुका प्रमुख योगेश पवार,जफर लाला,अरविंद पाटील सिरपल्लीकर, इद्रिस शेवाळकर,राम गुंडेकर,प्रल्हाद पाटील पोटेकर,मारोतराव मोरे,सोहेल खान,सह आदी शिवसैनिक व युवा सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते
बाईट:-शिवसेनेच्या अयोध्याताई पौळ
बाईट :- कृष्णा पाटील आष्टीकर
हिमायतनगर प्रतिनिधी नागेश शिंदे