हिमायतनगर प्रतिनिधी/- संपूर्ण महाराष्ट्र भर आपल्या सामाजिक कार्यातून जनसामन्याच्या अडचणी सोडवून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सदैव तत्पर असलेली संघटना म्हणजे माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समिती होय. या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष महेश सारणीकर, राज्य उपाध्यक्ष विनोद गायकवाड, कार्याध्यक्ष सखारामपंत कुलकर्णी, संपर्कप्रमुख विकास गोरवाडकर , मराठवाडा विभागीय उपाध्यक्ष राजु शिंदे.यांच्या मार्गदर्शनाखाली दि 23 जुलै 2023 रोजी छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय विश्रामगृह सुभेदारी हॉल मध्ये माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समिती ची राज्यस्तरीय बैठक पार पडली.यावेळी हिमायतनगर मध्ये सामाजिक क्षेत्रात व पत्रकारिता क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणारे पत्रकार माधव काईतवाड बोरगडीकर यांची नांदेड जिल्हा उपाध्यक्ष पदी नियुक्ती देऊन त्यांना नियुक्तीपत्र व ओळखपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
पत्रकार माधव काईतवाड बोरगडीकर यांची सामाजिक व पत्रकारिता क्षेत्रात वाढते प्रभुत्व व पत्रकारिता क्षेत्रात सक्रियपणे काम करतात. तसेच त्यांचा चांगला जनसंपर्क देखील आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत कामगिरी पाहता त्यांना नांदेड जिल्हा उपाध्यक्ष पदी नियुक्त करण्यात आले आहे. त्यांची निवड झाल्याबद्दल माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीच्या सर्व उपस्थित पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.ही निवडी झाल्याबद्दल महाराष्ट्र पर्व लाईव्ह न्युज चे मुख्य संपादक गंगाधर गायकवाड,मराठी पत्रकार संघांचे तालुका उपाध्यक्ष नागेश शिंदे,लोकस्वराज्य आंदोलन चे तालुका अध्यक्ष धोंडोपंत बनसोडे, स्वराज्य संघटनेचे तालुका अध्यक्ष मुन्ना भाऊ शिंदे, ज्ञानदीप कोचिंग क्लासेस चे संचालक तथा रिपब्लिकन न्युज चे मुख्य संपादक देवानंद गुंडेकर, महाराष्ट्र नवपर्व चे संपादक विजय वाठोरे, लोकतंत्र न्युज लाइव्ह चे ता.प्रतिनीधी जेरगेवाड बाबाराव,पत्रकार प्रशांत राहुलवाड, पत्रकार कृष्णा राठोड,शंकर बरडे, लिंगोजी कदम पाटील,लंकेश वाठोरे यांच्यासह अनेकांनी अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या आहेत.