तामसा दि. 25 (प्रतिनिधी):- छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था अर्थात सारथी संस्थेच्या वतीने मराठा समाजातील युवक युवतींसाठी मोफत व्यक्तिमत्व विकास व संगणक कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येणार आहे. महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड मार्फत हे प्रशिक्षण गुरुकृपा कॉम्प्युटर इन्स्टिटयूट ग्रामपंचायत कॉम्प्लेक्स तामसा ता. हदगांव येथे देण्यात येणार आहे. कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत ही योजना आखण्यात आली आहे. यातून मराठा व कुणबी मराठा समाजातील
वयोगट १८ ते ४५ तसेच कमीत कमी 10 उत्तीर्ण युवक,युवतींसाठी लाभदायी ठरणार दहावी उत्तीर्ण उमेदवारांना हे आहे. व्यक्तिमत्त्व व संगणक कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी पात्र उमेदवारांने *गुरुकृपा कॉम्पुटर इन्स्टिटयूट तामसा* ता. हदगांव चे संचालक शंकर एस. जगदाळे सर यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन केले आहे अनेकदा संगणक प्रशिक्षणासाठी तालुका पातळीवर संस्था असल्या तरी व्यक्तिमत्व विकासासाठी आवश्यक मार्गदर्शन तालुका पातळीवर मिळताना अडचणी निर्माण होतात त्यामुळे ही योजना अनेक मराठा युवक
मराठा समाजातील युवक युवतींना | आरक्षण नसल्यामुळे शासनाच्या कुठल्याही कोर्सला सवलती मध्ये प्रवेश मिळत नाही परंतु सारथी संस्थेमार्फत अशा प्रकारचे मोफत कोर्स तसेच इतर शैक्षणिक सवलत सारथी संस्थेमार्फत मराठा समाजातील युवक युवतींना मिळत आहेत. म्हणून मराठा समाजातील विद्यार्थ्यांनी सारथी संस्थेमार्फत जे काही कोर्स तसेच इतर शैक्षणिक
सवलतीचा लाभ घ्यावा.शंकर एस. जगदाळे
संचालक – शंकर एस. जगदाळे सर मो.9421293843. # सत्यप्रभा न्यूज # नांदेड