छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी | विजय पाटील |
छत्रपती संभाजीनगर दि. १२ /०९/२०२३
मराठा आरक्षणावर गेल्या १५ दिवसांपासून सुरु असलेल्या आमरण उपोषण आता निर्णायक वळणावर पोहोचले असून काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १ महिन्याची मुदत मागितली होती त्यावर मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला १ महिन्याची मुदत दिली असून आतापर्यंत ४० वर्षे दिली एक महिनाही देवून पाहू. मुख्यमंत्री व त्यांचे मंत्रीमंडळ उपोषणस्थळी आल्यावरच उपोषण सोडू अन्यथा उपोषण सुरुच राहणार असा निर्णय मनोज जरांगे पाटील यांनी आज, १२ सप्टेंबर रोजी जाहीर केला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांना केलेल्या विनंतीनुसार आज दुपारच्या सुमारास मनोज जरांगे यांनी उपोषणस्थळी उपस्थित असलेल्या मराठा समाज बांधवाशी संवाद सांगितला. मनोज जरांगे पाटील म्हणाले की, मराठा आरक्षणासाठी आतापर्यंत ४० वर्षे दिले अजून १ महिना देवून पाहू परंतू ३१ व्या दिवशी सरसकट मराठ्यांना आरक्षणाचे पत्र देणार का, असा सवाल उपस्थित केला. माझी बांधीलकी ही मराठा समाजासोबत आहे. मराठा समाजाशी गद्दारी करणार नाही. मराठ्यांच्या झोळीत आरक्षणा टाकल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा निर्धारही जरांगे पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.
छत्रपती संभाजीनगर