औरंगाबाद प्रतिनिधी | विजय घोनसे | मराठा आरक्षणासाठी गेल्या ३० ऑगस्टपासून सुरु असलेल्या उपोषणाची दखल राज्य सरकारने घेतली मात्र, जीआरमध्ये सरसकट मराठा असा उल्लेख नसल्याने उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील आणि सरकारची चर्चा फिस्कटली. सरकार जोपर्यंत मराठ्यांना सरसकट आरक्षणाचा स्पष्ट जीआर काढत नाही तोपर्यंत उपोषणातून माघार घेणार नाही.
उलट उद्यापासून उपोषण आणखी तीव्र करण्याचा निर्धार जरांगे पाटलांनी केला असून डॉक्टरांचा कुठलाही उपचार स्वीकारणार नसून पाणीही पिणार नसल्याची घोषणा आज, ९ सप्टेंबर रोजी जरांगे पाटील यांनी केली.