मुंबई दि .२२: मनोज जरांगे पाटील यांनी भुजबळांकडे सहा हजार कोटी रुपयांची संपत्ती असल्याचं वक्तव्य केलं होतं. शनिवारी पत्रकारांशी बोलताना जरांगे पाटील यांनी भुजबळांच्या संपत्तीवर भाष्य केलं होतं. यावर भुजबळांनी प्रतिक्रिया दिली आहे. कालिदास कलामंदिर येथे शनिवारी अमृतकलश यात्रेनिमित्त आयोजित कार्यक्रमात भुजबळ उपस्थित होते. या कार्यक्रमांनंतर भुजबळांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलंय.माझ्याकडे सहा हजार कोटी रुपयांची संपत्ती असल्याचं टीकाकार सांगतात. आता बोलण्यापासून कुणाला अडवावं, लोकशाही आहे. लोकांना वाटेल ते बोलण्यामागे प्रसिद्धी असते. माझ्याकडे इतकी संपत्ती असेल, तर मला पाचशे कोटी रुपये आणून द्या आणि माझी सर्व संपत्ती घेऊन जा, असं छगन भुजबळ म्हणाले. दरम्यान, ड्रग्ज प्रकरणावर देखील भुजबळांनी भाष्य केलं. ड्रग देश-विदेशात कुठे जात होते, याचा तपास व्हायला हवा, असं भुजबळ म्हणालेत.
#सत्यप्रभा न्यूज #नांदेड