लातूर प्रतिनिधी | विजय पाटील
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (अजित पवार गट) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या वक्तव्यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. त्यामुळे धाराशिव आणि लातूर जिल्ह्यांतील प्रबळ दावेदार आणि इच्छुकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. या आशेला पालवी फुटते की, पुन्हा निराशाच पदरी पडते, हे लवकरच स्पष्ट होईल.
हे सरकार सत्तेत आल्यापासून मंत्रिमंडळ विस्तार सातत्याने लांबणीवर पडत गेला. सत्तेत तिसरा पक्ष भागीदार झाल्यामुळे विस्ताराबाबत सरकारच्या अडचणी वाढत गेल्या. आता या टप्प्यात १४ जणांना संधी दिली जाणार असल्याची चर्चा आहे. धाराशिव जिल्ह्यात भाजपकड़ून तुळजापूरचे आमदार राणाजगजितसिंह पाटील हे मंत्रिपदाचे प्रबळ दावेदार आहेत. त्यांना पहिल्याच विस्तारात मंत्रिपद मिळेल, अशी शक्यता होती.