हिमायतनगर प्रतिनिधी/- नांदेड जिल्ह्याचे नवनिर्वाचित भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर पाटील भोयर यांच्या मार्गदर्शनाखाली हिमायतनगर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती यांची भाजपाच्या जिल्हा सरचिटणीस पदी नुकतीच निवड करण्यात आली त्याचबरोबर हिमायतनगर येथील बजरंग दलचे माजी तालुका अध्यक्ष गजानन भाऊ चायल यांची हिमायतनगर भाजपाच्या तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याने चायल यांच्या वर विश्वास ठेऊन आगामी काळात गाव तेथे शाखा घर तेथे भाजपा कार्यकर्ता करण्याचे उद्दिष्टे ऊराशी बाळगून हिमायतनगर तालुक्यातील बोरगडी वारंगटाकळी सह असंख्य गावातील अनेक नवतरुण युवकांचा त्यांनी भाजपा मध्ये प्रवेश करून घेत भाजपा वाढीसाठी ते प्रयत्न करत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे यांच्या निवडीने हिमायतनगर मतदारसंघात भाजपाचे चांगलेच वारे आगामी काळात वाहणार असल्याची जोरदार चर्चा शहरात रंगत आहे…..
महाराष्ट्राच्या राजकारणासह जिल्ह्याच्या राजकारणातही प्रचंड घडामोडी चालू आहेत नुकतेच नांदेडचे भारतीय जनता पक्षाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष बदलले. त्याजागी सुधाकर भोयर पाटील यांची वर्णी लागल्या मुळे त्यांनी ग्रामीण भागातील गटातटाच्या राजकारणाला ‘ब्रेक’ देत ग्रामीण भागातील एकनिष्ठ कार्यकर्त्यांना न्याय देण्यासह भाजपाचे संघटन मजबूत करण्यासाठी भर दिला असून हिमायतनगर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तथा निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ओळखले जाणारे गजानन भाऊ तुप्तेवार यांची नुकतीच जिल्हा सरचिटणीस पदी निवड केली त्याच बरोबर भाजपा च्या जिल्हा उपाध्यक्षपदी सुधाकर पाटील सोनारीकर ,चिटणीस आशिष सकवान व हिमायतनगर च्या नवनिर्वाचित भाजपाचे तरुण तडफदार युवा कार्यकर्ते म्हणून परीचित असलेले गजानन भाऊ चायल यांची तालुका अध्यक्ष म्हणून निवड करून मतदारसंघातील चागल्या चागल्या राजकीय नेत्यांना त्यांनी धक्का दिला आहे ह्याच बरोबर जिल्ह्यातील जवळपास सर्वच सक्रिय तालुका अध्यक्षांच्या नियुक्त्या अतिशय धडाक्यात केल्या त्यांनी केल्या
या पार्श्वभूमीवर हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघावर आगामी काळात माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता ताई पाटील यांचे वर्चस्व दिसू लागले आहे गेल्या आठवड्याभरापासून हिमायतनगर तालुक्यातील बोरगडी, वारंगटाकळी सह आदी गावात भारतीय जनता पार्टीचे वारे चागलेच वाहू लागले असल्याचे पहायला मिळत आहे भारतीय जनता पार्टीच्या नवनिर्वाचित टीमने हिमायतनगर तालुक्यातील भाजपा वाढीचे काम धुमधडाक्यात सुरू केले आहे त्यामुळे इतर पक्षांच्याही कार्यकर्त्यांच्या काळजाचा ठोका चुकला व आपोआपच असंख्य कार्यकर्ते भाजपाचे नेतृत्व मान्य करीत भाजपात प्रवेश करीत आहेत त्यामुळे येणाऱ्या आगामी स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीत सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांना मात्र भाजपा चांगलाच हिसका दाखवणार असल्याची चर्चा हिमायतनगर शहरासह तालुक्यात रंगत आहे
चौकट
नवनिर्वाचित भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस गजानन तुप्तेवार व तालुका अध्यक्ष गजानन चायल यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव…
हिमायतनगर तालुक्यात ठीक ठिकाणी भाजपाच्या नवनिर्वाचित टीमचे गावकरी व समाज बांधवांकडून स्वागत करून त्यांचावर मोठ्या प्रमाणात शुभेच्छांचा वर्षाव होत असल्याने सत्ताधारी पक्षांना ह्यांची चागलीच चाहूल लागली आहे