हिमायतनग प्रतिनिधी नागेश शिंदे/- तालुक्यात भर दिवसा जबरी चोरीची घटना घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे संगम बँकेचे मॅनेजर व इंडसइंड बॅचेचे मॅनेजर बालाजी पंतूलवाड हे नेहमी प्रमाणे दि.4 ऑगस्ट रोजी दरेसरसम तलावा जवळ पवना ,आंदेगाव येथील बचत गटाची वसूली करुन 1,62,235 रुपये आपल्या बॅगे मध्ये मोटार सायकलवरुन घेऊन येत असताना दरेसरसम तलावा जवळ दुपारी 12.30 वा. दोन अज्ञात इसमानी दुचाकीवरुन आले व गाडी आडवी लावून चाकूचा धाक दाखवून 1,62,235 रुपयाची बॅग हिसकावून पसार झाले. त्या अज्ञाता विरुद्ध हिमायतनगर पोलीस स्टेशन मध्ये 4 ऑगस्ट रोजी उशिरा 18.6 मिनिटाला उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला फिर्यादी बालाजी पंतूलवाड यांच्या फिर्यादी वरुन पोलीस निरीक्षक बी.डी. भूसनुर यांनी गुन्हा दाखल करून घेतला व आरोपीचा शोध घेत आहेत
या बाबत सविस्तर वृत्त असे की की बालाजी माधव पंतुलवाड वय 23 रा. मोघाळी ता.भोकर येथील रहिवाशी असून तो हिमायतनगर येथील इंडसइंड बॅकेत मॅनेजर असून तो सकाळी 7 वा. महिला बचत गटाला दिलेल्या कर्जाची वसूली करण्यासाठी पवना येथे जावून जि.प.शाळा येथून दोन बचत गटाची मिटींग घेवून 79878 रुपयाची वसूली केली. पवना व आंदेगाव येथे साई बाबा मंदीर येथे दोन बचत गटाची मिटींग घेवून त्यांच्या कडून 60550 रुपयाची वसूली केली. त्यानंतर आंदेगाव येथून ताडाची वाडी येथे पोहचला तेथे लिंबाच्या झाडाखाली बचत गटाची मिटींग घेवून 21472 रुपयांची वसुली केली. सर्व वसूली 1,61900 रुपये व बॅग मधील पूवीचे 335 असे असे 1,62,235 रुपये बॅग मध्ये घेवून आपल्या मोटार सायकलने बालाजी पंतुलवाड हे ताडाची वाडी येथून दरेसरसम जवळील चौफीली जवळ आले. तेथे दोन इसम मोटार सायकल घेवून थांबले होते तेथून बालाजी पंतुलवाड पुढे मोटार सायकलने निघाले असता पाहून दरेसरसम तलावाच्या जवळ त्या दोन इसमाने माझ्या मोटार सायकलच्या समोर आडवी दुचाकी लावली मला चाकूचा धाक दाखवून माझ्या जवळील 1,62235 रुपयाची बॅग हिसकावून घेवून पळून गेल्याची फिर्याद दिल्या नुसार दि 4 ऑगस्ट रोजी हिमायतनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेत जबरी चोरी करणारा युवक मोटार सायकल चालविणारा चोरटा सडपातळ ,अंगावर पांढरा शर्ट व निळा पॅट होता तर बॅग हिसकावणारा मजबुत शरीराचा पांढरे शर्ट व निळा पॅटचा होता. हे दोघेही 25/30 वयोगटातील होते. ते दोघेही नविन आंदेगाव रस्त्याने मोटार सायकलवरुन निघून गेले. जाते वेळी फिर्यादीच्या मोटार सायकल ची चाबी काढून घेतली. त्या नंतर बालाजी पंतूलवाड यांनी हिमायतनगर येथील इंडसइंड बॅकेचे संदिप टिपरेसवार यांना फोन करून तात्काळ मदत मागितली असे सांगितले त्यामुळे सबंधित घटनेतील आरोपींचा शोध हिमायतनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बी.डी. भुसनुर हे करीत आहेत