हिमायतनगर प्रतिनिधी नागेश शिंदे :शिक्षण क्षेत्रात विद्यार्थ्यांचा शारीरिक, बौद्धिक विकास घडवणाऱ्या आदर्श शिक्षकांसाठी एक सन्मान जनक पुरस्कार म्हणजे आदर्श शिक्षक पुरस्कार असतो. तो विविध क्षेत्राबरोबर शिक्षण क्षेत्रात आपली चांगली कामगिरी करणाऱ्या शिक्षकांना दिला जातो. असेच एक आदर्श शिक्षक तथा हिमायतनगर शहरातील अनेक विद्यार्थ्यांचे प्रेरणास्थान ठरलेले श्री सचिन एकनाथराव कळसे यांना ओळखले जाते. असे म्हटले जाते की ज्ञानार्थ यावे व सेवार्थ जावे.ती उक्ती अगदी तंतोतंत त्यांनी खरी करुन दाखविली.
त्यांचा अल्प परिचय पुढिलप्रमाणे:- सरस्वतीबाई एकनाथ कळसे यांच्या पोटी दिनांक १६ एप्रिल १९८९ रोजी हिमायतनगर येथे सचिन यांचा जन्म झाला. लहानपणापासूनच शिक्षणाची गोडी असल्यामुळे व वडिलांच्या मार्गदर्शनाने नवोदय प्रवेशपूर्व परीक्षेत घवघवीत यश संपादन करून ते पास झाले व पुढील शिक्षण नवोदय मधून पूर्ण केल्यानंतर,एच.एस.सी.अहमदपूर येथे व डी.एड. पालममधून पूर्ण केल्या नंतर सी. ई. टी. देऊन आपल्याच मूळ गावी पदस्थापना मिळाली. हिमायतनगर तालुक्यातील बोरगडी तांडा एक येथे त्यांची प्रथम नियुक्ती सहशिक्षक म्हणून झाली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना बोली भाषेचा प्रश्न असल्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना त्यांनी बंजारी भाषा ऐवजी आपल्या मूळ मराठी मातृभाषा बोलण्याची सक्ती केली त्यामुळे मुलांमध्ये शैक्षणिक मराठीची गोडी निर्माण झाली. त्यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना बौद्धिक ज्ञानाचे धडे देऊन त्यांना या स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी बळ निर्माण करून दिले.
दिनांक तो पाढा, गटागटात अध्ययन,परिपाठात प्रश्नमंजूषा असे विविध उपक्रम राबविले. या भागात ते नियमित पालक सभा व व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून लोकसहभागातून शाळा डिजिटल केली. शिक्षक हा समाजाचा आरसा असतो त्यानुसार त्यांनी त्यांचे आचरण नेहमी आदर्शवत ठेवले.
मनुष्य हा मरेपर्यंत विद्यार्थी असतो, या ओळीला साजेसे त्यांनी दिल्लीच्या IGNOU या माध्यमातून बी.एड. उत्तीर्ण केले. त्यानंतर २०१८ साली अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी त्यांची निवड झाली. त्या माध्यमातून त्यांनी सर्व शिक्षकांचे प्रश्न शासन दरबारी लावून ते सोडविण्यासाठी प्रयत्न केला.तालुक्यातील सर्व शिक्षकांची एकजूट बांधून ग्रामीण रुग्णालय हिमायतनगर व प्राथमिक आरोग्य केंद्र सरसम येथे त्यांनी आर. ओ. बसविण्या साठी मोलाचा वाटा उचलला. त्याचबरोबर हिमायतनगर शहरातील अनेक विद्याथ्यांना क्रिकेट, व्हाॅलीबॉल सारख्या अनेक खेळांचे अनमोल मार्गदर्शन ते नेहमी करत असतात. सार्वत्रिक बदलीमध्ये नुकतेच त्यांना हिमायतनगर शहरातील जिल्हा परिषद शाळा,नेहरुनगर क्रं.02 येथे त्यांची पोस्टिंग मिळाली.त्यानंतर त्यांनी वडिलांच्या स्मरणार्थ त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त श्री परमेश्वर मंदिरास भेटवस्तू दिली. त्याचबरोबर शैक्षणिक,सामाजिक कार्यात सुद्धा नेहमी अग्रेसर राहून काम करनारे शिक्षक म्हणून त्यांची ओळख आहे. त्यामुळे ते अनेक विद्यार्थ्यांचे प्रेरणास्थान ठरत आहेत. अशी त्यांची ओळख हिमायतनगर शहरा सह तालुक्यात निर्माण होत आहे.
– नागेश परमेश्वर शिंदे, हिमायतनगर प्रतिनिधी